Kadamba Transport Dainik Gomantak
गोवा

Kadamba Transport Corporation : आता कदंब बस ट्रॅक करा ऑनलाईन, अ‍ॅपमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार

कदंबच्या ‘लाईव्ह बस ट्रॅक अॅप’चा आजपासून प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यास सुरुवात

गोमन्तक डिजिटल टीम

Kadamba Bus Live Tracking App : आता कदंबाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. कदंब महामंडळाने ‘लाईव्ह बस ट्रॅक अ‍ॅप’ लाँच केले असून आजपासून त्याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पुढील 15 दिवस वापर करण्यात येणार असून 1 ऑग्स्टपासून या अ‍ॅपची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

काही महिन्यांपूर्वी कदंब महामंडळाने ‘लाईव्ह बस ट्रॅक अ‍ॅप’ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. या अ‍ॅपच्या मदतीने प्रवाशांना कदंबा बसचे लोकेशन मिळण्यास मदत होणार आहे. 'या अ‍ॅपमुळे नागरिकांच्या कदंब प्रवासासंदर्भातील अनेक समस्या सुटतील', असा विश्वास कदंबा महामंडळाने व्यक्त केला.   

महामंडळाला हे अ‍ॅप बंगळुरु येथील रोमन टेक्नॉलॉजी या कंपनीने​ मोफत तयार करून दिलेले आहे. १५ जुलैपासून हे अॅप प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यास सुरुवात करण्यात आले असून पुढील पंधरा दिवस नियंत्रण ठेवून आणि त्रुटी दूर करून 1 ऑगस्टपासून अ‍ॅपची सर्वच प्रवाशांसाठी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, भावनिक VIDEO शेअर करत म्हणाला, "मी माझ्या फलंदाजीमध्ये..."

Mapusa Traffic Police: म्हापशाच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक जॅमला बसणार ब्रेक! 'वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवा!' उपसभापतींच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक

Goa Cyber Fraud Cases: गोव्यात सायबर फसवणुकीचे वाढते जाळे; ऑनलाईन व्यवहारांत नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा, पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

Bharatiya Nyaya Sanhita Cases: सुमारे 78% प्रकरणांत आरोपपत्रे दाखल; 'बीएनएस' अंतर्गत गेल्‍या दोन वर्षांत 4,459 गुन्‍ह्यांची नोंद

Goa Cooperative Societies: राज्यातील 42% सहकारी सोसायट्या बंद, 42% सोसायट्या तोट्यात; सहकार क्षेत्राच्या आर्थिक सक्षमतेवर केंद्रीय सहकारमंत्र्यांकडून प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT