Police Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: पोळे तपासणी नाक्यावर 5 लाखांची दारू जप्त

Goa Crime News: वाहनचालक मल्लिकार्जुन हिरेमठ याला ताब्यात घेण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime News: अबकारी खात्याच्या काणकोणमधील अधिकाऱ्यांनी कारवारच्या बाजूने जाणाऱ्या केए ४७ ए ४४७६ या वाहनातून पोळे तपासणी नाक्यावर अवैध मार्गाने नेणारी ५ लाख ८ हजार ८०० रुपयांची दारू वाहनासह जप्त केली.

बुधवारी (ता.२९) रात्री अबकारी खात्याचे काणकोणमधील निरीक्षक शंबा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. वाहनचालक मल्लिकार्जुन हिरेमठ याला ताब्यात घेण्यात आले आहे.

या वाहनांत २२५ बॉक्समध्ये वेगवेगळ्या ब्रँडची दारू होती. ही दारू एका मासे वाहतूक करणाऱ्या कंटेनरमधून नेत होते. कंटेनरच्या पुढील बाजूस मासे वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बर्फने भरलेल्या क्रेट्‌स ठेवून दारूचे बॉक्स लपविले होते.

वाहन पोळे तपासणी नाक्यावर पोहोचल्यावर अबकारी खात्याच्या कर्मचाऱ्यांनी वाहनांची तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.

चालकांची अदलाबदली

अबकारी खात्याच्या कर्मचाऱ्यांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे. हा चालक मूळ बिजापूर-कर्नाटक येथील असून त्याला दुसऱ्या एका वाहनचालकाने बाळ्ळी येथे हा कंटेनर अंकोला येथे नेण्यास सांगितले.

तेथून दुसरा वाहनचालक कंटेनर घेऊन पुढे जाणार होता, अशी जबानी या वाहनचालकाने दिल्याचे अबकारी निरीक्षक शंबा नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT