Liquor Smuggling  Dainik Gomantak
गोवा

मद्य तस्करीसाठी वापरली वेगळीच शक्कल! विमानातून नेली १२ लाखांची दारू; प्रवाशांकडून ४१५ बाटल्या जप्त

Goa Liquor Smuggling: गोव्यातून अन्य राज्यात दारूच्या तस्करीसाठी अनेक मार्गांचा अवलंब आजवर केला गेला आहे

गोमन्तक डिजिटल टीम

Airoplane Liquor Smuggling

पणजी: गोव्यातून अन्य राज्यात दारूच्या तस्करीसाठी अनेक मार्गांचा अवलंब आजवर केला गेला आहे. आता विमानातून अशी तस्करी होत असल्याचे आज उघड झाले. गोव्यातून हैदराबाद येथे गेलेल्या तीन विमानांतील काही प्रवाशांकडून दारू जप्त केली आहे.

हैदराबाद येथील शमशाबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांकडून १२ लाख रुपयांच्या ४१५ दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांना ही दारू सापडू नये यासाठी बबल व्रॅपमध्ये या बाटल्या गुंडाळण्याची क्लृप्ती वापरण्यात आली होती. मात्र, हैदराबाद येथे तेथील अबकारी अधिकाऱ्यांनी संशयावरून या प्रवाशांचे साहित्य तपासले असता त्यात त्यांना दारूच्या बाटल्या आढळून आल्या. कर न भरता या बाटल्या आल्याने त्या जप्त केल्या आहेत.

मद्य तस्करीची चौकशी सुरू

अबकारी खात्याने पी. व्यंकटेश, श्रीराम, जी. श्रावण, एम. रामकृष्ण, राजीरेड्डी, रघू गौड, के. हरीश यादव या सात जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. त्यांनी ही दारू गोव्यात कुठे घेतली. गोव्यातील विमानतळावर ही दारू कशी पकडली गेली नाही.

ही दारू त्यांनी व्यक्तीगत वापरासाठी आणली होती की विकण्यासाठी, त्यांनी या दारूची वाहतूक अन्य कोणाच्या सांगण्यावरून केली आहे का, याचा तपास अबकारी खाते करणार आहे. यासाठी या सातही जणांना चौकशीसाठी बोलावले गेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

France Protest: नेपाळनंतर फ्रान्समध्ये 'अराजक'! नवा पंतप्रधान निवडताच उसळला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोड सुरु; 200 आंदोलकांना अटक VIDEO

"माझे आजोबा पंतप्रधान...", प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीची Post Viral; नेपाळच्या राजकारणाशी नेमका संबंध काय?

Goa Assembly Speaker Election: सभापतीपदाच्या खूर्चीवर कोण बसणार? विरोधी पक्षाकडून एल्टन डिकॉस्ता मैदानात; सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराचं नाव गुलदस्त्यात

Goa Cabinet: दिवाडीतील सप्तकोटेश्वर मंदिराचा चेहरामोहरा बदलणार; 'कोटी तीर्थ कॉरिडॉर'ला मंत्रिमंडळाची मंजुरी

Goa Taxi Issue: 'विश्वास ठेवला अन् सरकारनं फसवलं'; टॅक्सी व्यावसायिकांची मंत्रालयाबाहेर गर्दी, सीएमनी दिला Busy असल्याचा मेसेज

SCROLL FOR NEXT