Liquor Smuggling : दोन कोटी रुपयांची दारू राज्याबाहेर गेली कशी; पाच चेकनाके, तरीही तस्करी सुरूच

Liquor Smuggling : : ट्रक भरून दारू नेली जात असताना कोणत्याही यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांच्या ती लक्षात कशी आली नाही, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.
Liquor Smuggling
Liquor Smuggling Dainik Gomantak

Liquor Smuggling : :

पणजी, गोव्याच्या प्रत्येक सीमेवर अबकारी, वन, पोलिस, खाण आणि वाहतूक अशा अनेक खात्यांचे तपासणी नाके आहेत. असे असतानाही राज्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या दारू राज्याबाहेर नेली जात आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा बंगळुरूलगत दोन कोटी रुपयांची बेकायदा दारू जप्त करण्यात आली.

ट्रक भरून दारू नेली जात असताना कोणत्याही यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांच्या ती लक्षात कशी आली नाही, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. महाराष्ट्र, केरळ व कर्नाटकात गोव्यातून नेली जाणारी दारू यापूर्वी मोठ्या प्रमाणात पकडण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या पोलिसांनी गस्त वाढवली आहे.

Liquor Smuggling
Goa Seashore : किनाऱ्यावरील ‘ती’ जागा पूर्ववत करण्यासाठी पाहणी

तेलंगणच्या हद्दीत गोवा-बंगळूर महामार्गावर बालानगर ते जाडचेर्लाच्या दरम्यान एक ट्रक संशयावरून थांबवला असता तो दारूने भरलेला आढळून आले. ट्रकातील दोघाजणांनी ही दारू गोव्‍यातून आणली असल्याचे सांगितले. दारू वाहतुकीसाठीचा वैध परवाना नसल्याने ही दारू बेकायदा ठरली आणि ट्रकसहीत जप्त करण्यात आली.

ट्रकमध्ये ८०० खोके दारू

पोलिसांना ट्रकात दारूचे ८०० खोके आढळले. ही दारू आंध्र प्रदेशात निवडणुकीदरम्यान वाटण्यासाठी नेली जात असल्याचा तेथील पोलिसांचा संशय आहे. चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले आहे.

ही दारू कोणाच्या सांगण्यावरून आणली, एखादा राजकीय पक्ष किंवा उमेदवार यामागे आहे का, याची पोलिसांना तातडीने माहिती मिळू शकली नाही. गोव्‍यात दारू स्वस्त मिळत असल्याने ती तेथून आणली जाते, असे तेलंगण अबकारी खात्याचे म्हणणे आहे. ते खाते याप्रकरणी पुढील तपास करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com