Lightning in Curchorem
Lightning in Curchorem Dainik Gomantak
गोवा

Lightning in Curchorem Video: कुडचडे येथे घरावर पडली वीज, गरीब महिलेच्या घराचे मोठे नुकसान

Pramod Yadav

Lightning in Curchorem: कुडचडे येथे घरावर वीज पडल्याने महिलेच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. गुरूवारी (दि.01) पहाटे सहाच्या सुमारास ही घटना घडली.

दक्षिण गोव्यात सकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली, यात विविध ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले तर, काही ठिकाणी घरावर झाड पडल्याने घराचे नुकसान झाले.

(Lightning damaged house in Curchorem, Poor owner suffers huge loss)

वीज पडल्याने घराच्या भिंतींना भेगा पडल्या आहेत. स्वंयपाक घराचे देखील नुकसान झाले असून, घरातील काहींना किरकोळ जखम झाली आहे. वीज पडल्यानंतर घरात आग लागल्याचा दावा महिलेने केला आहे. त्यामुळे घराच्या ढाचा निर्मितीसाठी वापरलेल्या लाकडी खाबांना देखील आग लागली.

घटना घडल्यानंतरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात घरातील भांडी, इतर वस्तू आणि भिंतीचे मोठाले भाग खाली कोसळल्याचे दिसत आहे.

सकाळी सहाच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर ही घटना घडली, वीज पडताच आग लागली. त्यामुळे घरातील विद्युत पुरवठा खंडित झाला. घराच्या छपराचा भाग खाली कोसळला तसेच, घरातील इतर साहित्याचे देखील नुकसान झाले. असे या घरातील महिलेने म्हटले आहे.

आर्थिक परिस्थिती हालाखीची असलेल्या महिलेने झालेल्या नुकसानाची आमदार आणि मंत्री निलेश काब्राल यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

दरम्यान, दक्षिण गोव्यात सकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, यामुळे जिल्ह्यातील विविध भागात झाडे उन्मळून पडली, काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले. तर, वीज खांब कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi On UCC: गोव्याकडे पाहा! समान नागरी कायद्यावरुन प्रश्न विचारणाऱ्यांना PM मोदींचा सल्ला

Goa News : लोकसभा निवडणूक २०२४; मगोपची सावईवेरे येथे प्रचार सभा

Kolem News :कुळे, बेळगावहून येणाऱ्या चालत्या ट्रकला आग, ३२ लाखांचे नुकसान

Pakistan Road Accident: पाकिस्तानात भीषण अपघातात, 20 ठार 15 जखमी; बचावकार्य सुरु

Cape News : केपेतील दुफळी दूर करण्याचे प्रयत्न; जुन्‍या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्‍यासाठी श्रीनिवास धेंपे मैदानात

SCROLL FOR NEXT