गोवा राज्यात येत्या दोन दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळने वर्तवला आहे. या कालावलधीत मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला देखील वेधशाळेने दिला आहे.
(Light to moderate rain thundershowers very likely at goa a few places on 13th & 14th Dec )
गेल्या चार दिवसांपासून राजधानी पणजीसह राज्यातील मडगाव, वास्कोसह अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या भागात पाणी साचल्याचे चित्र होतं. यातच आता वेधशाळेने येत्या दोन दिवसात ( दिनांक 13, 14 डिसेंबर रोजी ) राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवल्याने नागरीकांना पुन्हा यानुसार आपल्या कामाचे नियोजन करावे लागणार आहे.
वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता असल्याचे देखील म्हटले आहे. त्यामुळे मासेमारीसाठी मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. यात्यामुळे मच्छीमारांनी सतर्क असणे आवश्यक आहे. गोव्यासह कर्नाटक, महाराष्ट्र, या राज्यात देखील पावसाची शक्यता असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.