IMD Goa Rain Forecast Dainik Gomantak
गोवा

IMD Goa Rain Forecast: राज्यात काही ठिकाणी 'या' दिवशी पडणार पाऊस; आगामी 4 दिवस तापमान वाढणार

गोवा वेधशाळेचा अंदाज

गोमंतक ऑनलाईन टीम

IMD Goa Rain Forecast: राज्यात आगामी चार ते पाच दिवसात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच शुक्रवारी 28 एप्रिल रोजी काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो, असा अंदाज गोवा वेधशाळेने (IMD Goa) वर्तविला आहे. काही ठिकाणी गडगडाटही होईल, असेही या अंदाजात म्हटले आहे.

दरम्यान, आकाश अंशतः ढगाळ राहू शकते, तसेच पहाटे अनेक ठिकाणी धुकेही पडू शकते, असेही आयएमडी गोवाने म्हटले आहे. आज, मंगळवारी 25 एप्रिल रोजी तसेच 26 आणि 27 एप्रिल रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 35 अंश सेल्सिअस आणि 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. सोमवारी राज्यात कोरडे हवामान होते आणि काही ठिकाणी धुके पडले होते. मंगळवारीही काही ठिकाणी धुके पडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT