Goa Murder Case| Margao Court  Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: कर्नाटकच्या मच्छीमाराचा गोव्यात खून; उत्तर प्रदेश, ओडिशातील दोघांना जन्मठेप

Goa Murder Case: खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले असून, जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Pramod Yadav

Goa Murder Case

वेळसांव येथे समुद्रकिनार्‍यालगत कर्नाटकच्या मच्छीमाराचा २ एप्रिल २०२१ रोजी खून झाल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी उत्तर प्रदेश आणि ओडिशा येथील दोघांना अटक करण्यात आली होती.

खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले असून, जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

वेळसांव येथे समुद्रकिनार्‍यालगत मद्याच्या नशेत दिनेश कुमार व शिवनाथ मांझी या दोघांनी लालू ऊर्फ सनी सिंग याचा खून केल्याचे उघडकीस आले होते. सनी सिंग याचा मृतदेह २ एप्रिल २०२१ रोजी एका शेडमध्ये आढळून आला होता.

वेर्णा पोलिसांनी तपासाअंती दिनेश कुमार भारतीय (46, उत्तर प्रदेश) आणि शिवनाथ मांझी (48, ओडिशा) या दोघांना अटक केली होती.

दारुच्या नशेत वाद, वादातून हाणामारी

दिनेश कुमार, शिवनाथ मांझी यांचा दारु पिण्यावरुन लालू ऊर्फ सनी सिंग यांच्यासोबत वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यातून दिनेश आणि शिवनाथ यांनी लालूच्या डोक्यात दांडकाने मारहाण करुन जखमी केले, यातच त्याचा मृत्यू झाला, असे तपासातून समोर आले.

न्यायालयाने याप्रकरणी दिनेश कुमार, शिवनाथ मांझी यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

देशातील करोडो नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO लवकरच सुरु करणार व्हॉट्सॲप सर्व्हिस; आता एका 'हॅलो'वर मिळणार पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती

Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 18 वर्षीय तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू, नास्नोळात खळबळ; म्हापसा पोलिसांकडून तपास सुरु

VIDEO: "Fu..." पराभवाच्या रागात ऋषभ पंतने ओलांडली मर्यादा; लाईव्ह मुलाखतीत वापरली आक्षेपार्ह भाषा! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT