डिचोली - मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे (rainfall) महाराष्ट्रातील (Maharashtra) तिल्लारी धरणातील (Tillari Dam) वाढलेली पाण्याची पातळी हळूहळू नियंत्रणात येत असून, तूर्त धरणातून जलविसर्गाचा (Aquifer) धोका नसल्याची माहिती धरण प्रकल्प सूत्रांकडून मिळाली आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. अशी माहिती डिचोलीचे (Bicholim) मामलेदार प्रवीणजय पंडित (pravinjay pandit) यांनी दिली आहे. परिस्थिती नियंत्रणात असली, तरी शापोरा नदीकाठी देण्यात सतर्कतेचा इशारा मात्र कायम आहे. दरम्यान, सतर्कतेचा इशारा दिल्याने साळ आणि आजूबाजूच्या परिसरातील जनता अस्वस्थ बनली असून, तिल्लारीच्या जलविसर्गाने मागील सलग दोन वर्षे साळ गावाला बसलेल्या पुराच्या तडाख्याच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.(Level control of Tillari Dam Warning to riverine villages)
कालपर्यंत 'तिल्लारी' पाण्याने धरणाचा शिखर स्तर गाठल्यानंतर पाणी बाहेर गोव्याच्या दिशेने वाहणाऱ्या शापोरा नदीत वाहू लागले. जलनिसर्गाचा धोका ओळखून धरणातील अतिरिक्त पाणी बाहेर सोडण्याची शक्यता वाढली होती. त्यामुळे शापोरा नदीचे पाणी वाढण्याची भिती निर्माण झाली होती. तशी सूचनाही तिळारी धरण प्रकल्प अधिकाऱ्यांनी जलस्रोत खात्याच्या (department of water resources) म्हापसा (Mapusa) येथील अधीक्षक अभियंता कार्यालयाला कालच दिली होती. या सूचनेची दखल घेत डिचोली तालुक्यातील साळसह, मेणकूरे आदी शापोरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नदीकाठी राहणाऱ्या जनतेने सतर्क राहून खबरदारी घ्यावी. नदीच्या पाण्यात उतरण्याचा धोका पत्करू नये. अशी सूचना वजा इशारा मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी जारी केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.