Bhoma Road Issue:  Dainik Gomantak
गोवा

Bhoma Road Issue: भोमचा रस्ता विषय हाती घेऊ! रमाकांत खलप

Bhoma Road Issue: भोम येथील काँग्रेसच्या सभेत ग्रामस्थांना आश्‍वासन

गोमन्तक डिजिटल टीम

Bhoma Road Issue

श्रीपाद भाऊ तुम्ही आता आराम करा, असा सल्ला देताना गोव्यातील शेती, कुळागरे आणि जमिनी वाचवण्यासाठी गोव्याचा आवाज लोकसभेत बुलंद करण्याबरोबरच भोमचा विषय प्रामुख्याने सोडवला जाईल, अशी ग्वाही उत्तर गोव्यातील काँग्रेसचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी दिली.

भोम येथे काँग्रेस पक्षातर्फे आज रविवारी आयोजित सभेत ग्रामस्थांशी संवाद साधण्याबरोबरच भोमच्या विषयावरून काँग्रेस पक्ष आवाज उठवील, असे ॲड. खलप यांनी सांगितले.

यावेळी गोवा फॉरवर्डचे नेते तथा आमदार विजय सरदेसाई, काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा, गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत, आम आदमी पक्षाचे फोंड्यातील नेते ॲड. सुरेल तिळवे, आरटीआय कार्यकर्ते राजन घाटे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते.

आमदार विजय सरदेसाई म्हणाले, की भारतीय जनता पक्षाकडून हिंदूंना गृहीत धरले जात आहे. हिंदू म्हणून आपण आवाज करायचा नाही का, अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा नाही का, असा सवाल करून आज केंद्रात बदल आवश्‍यक असून गोव्यातही दोन्ही जागा बदलण्याची गरज आहे. या बदलासाठी लोकांनी एकजूट दाखवण्याची आवश्‍यकता आहे आणि लोक ती दाखवतील असा आपल्याला विश्‍वास आहे. केंद्रात सरकार कुणाचेही घडो, पण खासदार ॲड. रमाकांत खलप असल्यावर भोमचा विषय नक्कीच सोडवला जाईल अशी आपल्याला खात्री वाटते.

आमदार कार्लुस फेरेरा म्हणाले, की श्रीपाद भाऊंनी आपल्या पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीत गोव्याबद्दल किती प्रश्‍न मांडले हा संशोधनाचा विषय असून श्रीपाद नाईक यांना आता घरी बसवून काँग्रेसचे रमाकांत खलप यांना भोमचा रस्ता प्रश्‍न तसेच इतर समस्यांवर आवाज उठवण्यासाठी दिल्लीला पाठवण्याची आवश्‍यकता असून भोमवासीय हे काम करतील, अशी आपल्याला खात्री आहे.

सुरेल तिळवे, दुर्गादास कामत, राजन घाटे यांनीही आपला पाठिंबा भोमवासीयांना देताना भोमचा प्रश्‍न सोडवण्यासाठी काँग्रेसच्या रमाकांत खलप यांना दिल्लीला पाठवा, असे आवाहन केले. स्वागत व सूत्रसंचालन संजय नाईक यांनी केले.

‘गोमंतकीयांचा आवाज होण्याची संधी द्या’

प्रश्‍न किंवा समस्या सोडवण्यासाठी मंत्रिपदच हवे असे नव्हे, तर लोकसभेतील गोमंतकीयांचा एक प्रतिनिधी म्हणूनही प्रश्‍न सोडवता येतात, हा आपला मागच्या खासदारकीचा अनुभव आहे.

शिवोलीतील रखडलेला पूल, कोकण रेल्वेला चालना देण्यासाठी आपण त्यावेळेला खासदार होतो आणि गोव्याचा आवाज त्यावेळेला केंद्र सरकारने ऐकला. त्यामुळेच आज पुन्हा एकदा गोमंतकीयांचा आवाज होण्याची संधी आपण द्यावी, असे आवाहन रमाकांत खलप यांनी केले.

समस्या सोडविण्याचा संकल्प

राज्यातील अनेक समस्यांची यादी तयार करू आणि त्यानुसार विविध समस्या सोडवण्यासाठी प्रामुख्याने विचारविनिमय करण्याचा संकल्प ॲड. रमाकांत खलप यांनी केला आहे.

भोम गावातून रस्ता नेण्यासाठी इतर पर्याय असताना नेमका गाव उद्ध्वस्त करून हाच पर्याय भाजपाने का स्वीकारला, असा सवाल खलप यांनी करून आपले गाव, आपली जमीन वाचवण्याची आज वेळ आली असल्याचे भोमच्या ग्रामस्थांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळवारचा दिवस महाशुभयोगाचा! 'या' 5 भाग्यवान राशींवर राहणार बजरंगबलीची कृपादृष्टी, धनालाभासह मिळणार नशिबाचीही साथ

Viral Video: धावत्या ट्रेनला लटकून स्टंटबाजी! 'हीरो' बनणाऱ्या पठ्ठ्याची मोडली खोड; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, 'बरं झालं...'

Santa Cruz Bogus Voters: निवडणूक आयोगाविरोधात गोव्यातही काँग्रेसचा एल्गार! सांताक्रुझ मतदारसंघात 3 हजार बोगस मतदार

AUS vs SA: टी-20 मध्ये ग्लेन मॅक्सवेल पुन्हा रचणार इतिहास! 'या' एलिट खेळाडूंच्या यादीत होणार सामील; घ्याव्या लागणार फक्त 'इतक्या' विकेट्स

Goa Tribal Reservation Bill: आदिवासींसाठी 'सोनियाचा दिनु', राजकीय आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर; अनेक वर्षांच्या लढ्याला यश

SCROLL FOR NEXT