Bilawal Bhutto India Visit Dainik Goamantak
गोवा

SCO Summit 2023: जयशंकर यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भुत्तो म्हणाले, 'आपल्या लोकांची सुरक्षा...'

बिलावल भुत्तो यांनी SCO च्या सदस्य राष्ट्रांना दहशतवादाचा वापर राजनैतिक साधन म्हणून करू नये आवाहन केले.

Pramod Yadav

SCO Summit 2023 Bilawal Bhutto India Visit: पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी शुक्रवारी शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीला हजेरी लावली. अध्यक्षस्थानावरून बोलताना भारतीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी दहशतवादाला अधोरेखित करत, सीमापार दहशतवादासह सर्व प्रकराच्या दहशतवादाला आळा घालायला हवा असे मत मांडले.

तर, बिलावल भुत्तो यांनी SCO च्या सदस्य राष्ट्रांना दहशतवादाचा वापर राजनैतिक साधन म्हणून करू नये आवाहन केले.

डॉ. एस जयशंकर यांनी दहशतवादाच्या मुद्दा उपस्थित केल्यानंतर बिलावल भुत्तो यांनी देखील बैठकीत बोलताना दहशतवादाचा सामना करण्यासाठी SCO सदस्य देशांच्या सहकार्यावर भर दिला. दहशतवादाच्या समस्येचे मूळ कारण शोधण्यासाठी संयुक्त प्रयत्न करण्याचे आवाहनही बिलावल यांनी यावेळी केले.

'आपल्या लोकांची सुरक्षा ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. राजनैतिक साधन म्हणून दहशतवादाला मुद्दा बनवण्यात अडकू नये' असे बिलावल भुत्तो म्हणाले.

गोव्यातील SCO बैठकीचा आज शेवटचा दिवस असून, भारत दौऱ्याची माहिती देणारे विविध ट्विटस् भुत्तो यांनी केले आहेत.

परस्पर समजूत, सुरक्षा आणि विकास यासाठी SCO सर्वांसाठी सामूहिक व्यासपीठ म्हणून समोर आले आहे. पाकिस्तानने गोव्यातील बैठकीसाठी उपस्थित राहत आमच्यासाठी ही बैठक किती महत्वाची आहे हे अधोरेखित केले आहे. असे बिलावल यांनी म्हटले आहे.

आफगाणिस्तानमधील स्थैर्य प्रादेशिक आणि आर्थिक सहकार्यासाठी आवश्यक आहेच, शिवाय जागतिक स्थैर्य आणि शांततेसाठी देखील ते महत्वाचे असल्याचे भुत्तो म्हणाले. मोठ्या आर्थिक शक्ती ज्यावेळी शांततेसाठी प्रयत्न करतात, त्यावेळी आम्ही देखील त्यासाठी सर्वोतपरी सहकार्य करण्यासाठी वचनबद्ध आहोत. असे भुत्तो यांनी म्हटले आहे.

दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी SCO बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. दहशतवाद कोणत्याही परिस्थितीत थांबण्याचे नाव घेत नाही. यात कोणत्याही किंमतीत तडजोड करता येणार नाही. टेरर फंडिंगला आळा घालण्यासाठी लक्ष द्यावे लागेल.

दहशतवादाचा अद्याप पूर्णपणे समूळ नायनाट झालेला नाही. दहशतवादाला न्याय्य ठरवता येणार नाही आणि त्याला सर्व प्रकारात आळा घालण्याची गरज आहे. दहशतवाद्यांना आर्थिक  मदत करणाऱ्यांनाही आळा घालण्याची गरज आहे. सीमेपलीकडील दहशतवादासह सर्व प्रकारचा दहशतवाद थांबवण्याची गरज आहे, असे जयशंकर यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: टी-20 क्रिकेटमध्ये यूएईच्या मोहम्मद वसीमचा वर्ल्ड रेकॉर्ड! बटलरला मागे टाकत रचला नवा इतिहास VIDEO

Viral Video: लग्नासाठी घरचे तयार नाही झाले तर काय कराल? पठ्ठ्यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले...

Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यावरुन गोव्यात रंगलं राजकारण; भाजप प्रदेशाध्यक्षांनी पवारांचं अज्ञानच काढलं

India vs Pakistan: ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है... Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आणखी दोनवेळा भिडणार, संपूर्ण 'गणित' समजून घ्या

गोव्यात दोन दिवस धुमाकूळ घालणारा 'ओंकार' अखेर महाराष्ट्रात दाखल; फटाके, बॉम्बच्या आवाजाने दणाणले जंगल

SCROLL FOR NEXT