Leopard In Goa Dainik Gomantak
गोवा

Leopard In Goa: डिचोलीत बिबट्याची दहशत, भर लोकवस्तीत वावर; विद्यार्थ्यांसह ज्येष्ठांच्या जीवाला धोका

Leopard In Bicholim: शहरात पुन्हा एकदा बिबट्याने दर्शन दिले असून शहरातील साष्टीवाडा -शांतारामनगर परिसरात बिबट्या दडून बसल्याची माहिती समोर आली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: शहरात पुन्हा एकदा बिबट्याने दर्शन दिले असून शहरातील साष्टीवाडा -शांतारामनगर परिसरात बिबट्या दडून बसल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून भर लोकवस्तीजवळ या बिबट्याची दहशत सुरु आहे. हा बिबट्या रात्रीचे सोडाच, दिवसाही संचार करीत आहे. लोकवस्तीजवळ बिबट्या फिरत असल्यामुळे स्थानिक लोक भयभीत बनले आहेत.

ज्या भागात बिबट्या नजरेला पडला आहे. तेथून विद्यार्थ्यांची ये-जा असते. त्याठिकाणी मुलेही खेळत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांसह लहान मुलांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती पालक व्यक्त करीत आहेत.

वन खात्याने त्वरित उपाययोजना करुन या बिबट्याला पकडावे, अशी मागणी निवृत्त शिक्षक दिनानाथ तारी यांच्यासह स्थानिकांनी केली आहे. शांतारामनगर परिसरात फिरताना हा बिबट्या माझ्या नजरेला पडला, असे स्थानिक समाजकार्यकर्ते विश्वास गावस यांनी सांगितले.

सापळा लावून या बिबट्याला पकडावे, अशी मागणी निवेदनाद्वारे वन खात्याकडे केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

तीन महिन्यांपूर्वी झाले हाेते दर्शन...

तीन महिन्यांपूर्वी शहरातील कृष्णानगर भागात एका बिबट्याने दहशत घातली होती. तत्पूर्वी, व्हाळशी येथील संकल्प गार्डन वसाहतीत तेथील रहिवाशांना बिबट्याचे दर्शन झाले होते. दीड वर्षापूर्वी शहरातील धबधबा परिसरात दोन बिबटे पकडण्यात आले होते.

दोन महिन्यांपूर्वी धबधबा येथे पुन्हा एकदा बिबट्याची दहशत सुरु होती. गेल्यावर्षी साष्टीवाडा-बोर्डे येथे कारची धडक बसून एक बिबट्या जखमी झाला होता. तत्पूर्वी, लामगाव परिसरातही बिबट्याने दहशत घातली होती. त्यामुळे डिचोली परिसरात बिबट्यांचा अधिवास असल्याचे स्पष्ट होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT