DRI officials seized 4 Leopard Skins in Srinagar, Jammu and Kashmir PIB
गोवा

बिबट्याच्या कातडीची तस्करी! DRI गोवाकडून जम्मू काश्मिरातून 8 जणांना अटक, 2 कोटींची कातडी जप्त

विभागाने त्यांच्याकडून बिबट्याची चार कातडी जप्त केली आहेत.

Pramod Yadav

Leopard skin smuggling DRI Goa arrests 8 people from Jammu Kashmir : बिबट्याच्या कातडीची तस्करीप्रकरणी केंद्रीय महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) गोवा विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. बिबट्याच्या कातडीची तस्करी केल्याप्रकरणी जम्मू - काश्मिरातून आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

विभागाने त्यांच्याकडून बिबट्याची चार कातडी जप्त केली आहेत. जप्त केलेल्या या कातडीची किंमत दोन कोटी एवढी असल्याचे सांगितले जात आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर इथल्या काही टोळ्या बेकायदेशीर वन्यजीव व्यापारात सक्रिय असल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळाली. टोळीतील सदस्यांना पकडण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयाने योजना आखण्यात आली. योजनेनुसार, मुंबई झोनल युनिट (गोवा प्रादेशिक युनिट)चे अधिकारी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरला पोहोचले.

अधिकाऱ्यांनी सापळा रचून श्रीनगर येथे बिबट्याची कातडी घेऊन फिरणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे श्रीनगरमधील सार्वजनिक ठिकाणी त्याच्या आणखी एका साथीदारालाही ताब्यात घेण्यात  आले. 

या तस्करीत गुंतलेल्या एका पोलीस हवालदारासह  एकूण 8 जणांना ताब्यात घेण्यात आले आणि एकूण 4 बिबट्यांची (पँथेरा परडस) कातडी  जप्त करण्यात आली. लडाख, डोडा आणि उरी येथून बिबट्याची शिकार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972च्या कलम 50(1)(c) च्या तरतुदीनुसार एकूण 4 बिबट्यांची  कातडी  जप्त करण्यात आली.

वन्यजीव (संरक्षण) कायदा1972 अंतर्गत प्राथमिक जप्तीच्या कारवाईनंतर वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972  अंतर्गत गुन्हा करणाऱ्या 8 व्यक्ती आणि जप्त केलेल्या प्रतिबंधित वस्तू, जम्मू आणि काश्मीर वन्यजीव संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

SCROLL FOR NEXT