Goa Leopard Dainik Gomantak
गोवा

Goa Leopards: कुत्री भुंकली म्हणून बाहेर गेले, तर समोर 'बिबट्या'; डिचोली परिसरात वाढती दहशत

Bicholim Leopard: डिचोली शहरातील धबधबा, लामगाव आणि साष्टीवाडा-बोर्डेनंतर आता व्हाळशी परिसरात बिबट्याचा संचार असल्याने स्थानिक भयभीत झाले आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.

Sameer Panditrao

डिचोली: डिचोली शहरातील धबधबा, लामगाव आणि साष्टीवाडा-बोर्डेनंतर आता व्हाळशी परिसरात बिबट्याचा संचार असल्याने स्थानिक भयभीत झाले आहेत. व्हाळशी येथील संकल्प उद्यान परिसरात भर लोकवस्तीजवळ एक बिबटा फिरत असून त्याची दहशत सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, स्थानिकांच्या तक्रारीनंतर गेल्या आठवड्यात वन खात्याने वसाहतीत कॅमेरा लावून दोन दिवस टेहळणी केली. मात्र, बिबटा असल्याच्या कोणत्याच खाणाखुणा आढळून आल्या नाहीत अशी माहिती मिळाली आहे, तर वसाहतीजवळ बिबट्याचा संचार आहेच असा स्थानिकांचा दावा असून या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी स्थानिकांची मागणी आहे.

डिचोली शहरातील विविध भागात बिबट्यांची दहशत वाढली आहे. गेल्या दीड वर्षात वन खात्याने धबधबा परिसरात दोन बिबट्यांना पकडण्यात यश मिळवले आहे, तर आठ महिन्यांपूर्वी गेल्या जानेवारी महिन्यात साष्टीवाडा-बोर्डे परिसरात मुख्य रस्त्यावर कारच्या धडकेत एक बिबटा जखमी झाला होता.

लामगाव परिसरातही एका बिबट्याचा संचार वाढला होता. यावरून शहरात बिबट्यांची दहशत असल्याचे स्पष्ट होत आहे.

‘कुत्री भुंकली म्हणून बाहेर पाहिले तर बिबटा!’

व्हाळशी परिसरात फिरणारी चार ते पाच भटकी कुत्री सध्या गायब असून, या कुत्र्यांना या बिबट्याने फस्त केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवड्यात रात्रीच्यावेळी साधारण साडेदहा वाजता कुत्री जोरजोरात भुंकत होती. नंतर बाहेर बघितले तर घरासमोर बिबटा उभा होता, अशी माहिती रत्नदीप देसाई यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT