Leopard in Borim 
गोवा

Leopard in Borim: बोरीतील गल्लीबोळात बिबट्याचा खुलेआम वावर! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; पहा व्हिडिओ

त्याला त्वरित जेरबंद करावे अशी मागणी वनविभागाकडे करण्यात आली आहे

Kavya Powar

Leopard in Borim: सध्या मानव वस्त्यांमध्ये बिबट्या दिसण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या फोंड्यातील बोरी गावात बिबट्या दिसून आला. बोरीतील गल्लीबोळांमध्ये बिबट्या खुलेआम वावरताना दिसला. गंभीर बाब म्हणजे अनेकजण बिबट्याच्या मागे-मागे चालत होते.

सध्या बिबट्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून बिबट्या निवांतपणे 'मॉर्निंग वॉक' करतोय असे अनेकांनी म्हटले आहे. बिबट्या चालत असताना अगदी काहीच फुटांच्या अंतरावरून नागरिक जिवाची पर्वा न करता त्याच्यामागून चालत आहेत.

त्याला पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. बिबट्यासारख्या जंगली प्राण्याचे असे माणसांच्या वस्तीमध्ये फिरणे अतिशय धोकादायक आहे. कारण शांत दिसत असलेला बिबट्या कधीही कुणावरही हल्ला चढवू शकतो.

त्यामुळे त्याला त्वरित जेरबंद करावे अशी मागणी वनविभागाकडे करण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बिबट्याने दिवसाढवळ्या शेळीवर हल्ला केल्याची घटना म्हाळसे, कुर्टी-फोंडा येथे घडली होती. घटनेनंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी पिंजरा लावला. मात्र या घटना आता सर्रास घडत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT