Arambol Agarwada Goa Leopard Dainik Gomantak
गोवा

Leopard Accident: .. रात्री स्कुटरला धडकला बिबट्या, गाडी कलंडल्याने विद्यार्थी जखमी; आगरवाडा येथील घटना

Arambol Agarwada Goa Leopard: या अपघातात स्कूटरचे थोडेफार नुकसान झाले, असे निकोलस याने सांगितले. या प्रकारानंतर स्थानिक नागरिकांनी या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे.

Sameer Panditrao

हरमल: आगरवाडा येथील चढणीवर रस्ता ओलांडणाऱ्या एका बिबट्याची धडक बसून स्कूटरवरून निघालेला एक विद्यार्थी जखमी झाला. बुधवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. या परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यातच ही घटना घडल्यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करणारा हरमल येथील विद्यार्थी असफ निकोलस (वय २४ वर्षे) हा स्कूटरवरून चोपडेहून हरमलला येत होता. आगरवाडा येथे पोहोचल्यावर एका चढणीवरील हॉटेलच्या पुढे पोचल्यानंतर मोकळ्या रानातून येऊन रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका बिबट्याची धडक त्याच्या स्कूटरला बसली.

त्यावेळी स्कूटर जोरात एका बाजूला कलंडली आणि निकोलस उसळून पडला, तर बिबटा दुसऱ्या बाजूला पडला. यावेळी अचानक गडबडलेल्या निकोलसने बिबट्याला पाहून आरडाओरडा केला आणि त्याही स्थितीत उठून हॉटेलच्या दिशेने जोरात धाव घेतली.

यावेळी बिबट्यानेही उठून जंगलाच्या दिशेनेे धूम ठोकली. त्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी निकोलसला धीर दिला आणि त्याला घरी जाण्यासाठी मदत केली. प्रवासादरम्यान निकोलसने हेल्मेट घातले होते. त्यामुळे त्याला विशेष दुखापत झाली नाही. मात्र, हाताच्या कोपराला आणि पायाला इजा झाली आहे. हेल्मेटमुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली नाही.

मात्र, या अपघातात स्कूटरचे थोडेफार नुकसान झाले, असे निकोलस याने सांगितले. या प्रकारानंतर धास्तावलेल्या स्थानिक नागरिकांनी या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'गोव्यात हुकूमशाही अन् जंगल राज'! LOP आलेमाव यांचा घणाघात; ‘संविधान बचाव अभियाना'त डिचोलीत जागृती

Goa Beaches: गोवा किनारी क्षेत्राबाबत नवी अपडेट! व्यवस्थापन आराखडा डिसेंबरमध्ये; मच्छीमार वस्तीमध्ये साकारणार पर्यटन प्रकल्प

Ro Ro Ferryboat: 4 बोटींचे काम रो-रो फेरीबोट करणार, 14 जुलैपासून गोमंतकीयांच्या सेवेत; जाणून घ्या 'या' सेवेची वैशिष्ट्ये

Goa Crime: 23 वर्षीय युवक ‘ड्रग्स पॅडलर’! सत्तरीतील बारवर छापा; 631 ग्रॅम गांजा ताब्यात

Russian Rescued: घनदाट जंगलात गुहेत आढळली रशियन महिला! गोवामार्गे पोचली गोकर्ण येथे; कारण ऐकून पोलीस झाले थक्क

SCROLL FOR NEXT