Leopard In Goa Dainik Gomantak
गोवा

Leopard In Goa: बिबट्या घरात घुसला अन् थेट खुर्चीखाली जाऊन बसला; तरवळे-शिरोड्यातील थरारक प्रकाराने परिसरात घबराट, उपचार केंद्रात रवानगी

Leopard Cub Under Chair: बिबट्याचा बछडा थेट घरात शिरतो आणि खुर्चीखाली जाऊन आरामात बसतो, तेव्हा त्या घरातील लोकांची अवस्था काय झाली असेल हे सांगणेच मुश्‍किल.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: बिबट्याचा बछडा थेट घरात शिरतो आणि खुर्चीखाली जाऊन आरामात बसतो, तेव्हा त्या घरातील लोकांची अवस्था काय झाली असेल हे सांगणेच मुश्‍किल. पण हा थरारक प्रकार तरवळे - शिरोड्यातील लाला नाईक यांच्या घरात घडला.

हल्ली सिद्धनाथ पर्वतावर बिबट्यांचा वावर वाढला आहे. फोंडा तालुक्यात विविध ठिकाणी बिबटे दृष्टीस पडत असतानाच आज बिबट्याचा बछडा थेट घरात शिरल्याने ही घटना भीतीयुक्त चर्चेचा विषय बनली आहे. सविस्तर माहिती अशी, की दुपारी बाराच्या सुमारास हा बछडा मातेपासून विभक्त होऊन डोंगरमाथ्यावरून खाली आला आणि लाला नाईक यांच्या घराच्या दिशेने निघाला. मात्र, लोखंडी गेटमधून घरात शिरण्याच्या प्रयत्नात हा बछडा लोखंडी सळ्यांमध्ये अडकला. बिबट्याला पाहून तेथील कुत्र्यांनी भुंकायला सुरुवात केल्यामुळे लोकांना हा प्रकार समजला.

गेटमध्ये अडकल्यानंतर बछड्याने सुटका करून घेण्याचा जोरदार प्रयत्न केला. दहा-पंधरा मिनिटे या झटापटीतच गेल्यानंतर शेवटी कशीबशी गेटमधून बछड्याने स्वत:ची सुटका करून घेतली आणि घरातील खुर्चीच्या खाली आसरा घेतला. त्यामुळे घाबरलेल्या नाईक कुटुंबीयांनी वन खात्याला यासंबंधीची माहिती देताच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन बछड्याला ताब्यात घेतले आणि त्याची रवानगी वन खात्याच्या फिरत्या उपचार केंद्रात केली.

दरम्यान, मातेपासून विभक्त झालेला हा बछडा एकच आहे, की या परिसरात आणखी बछडे आहेत, याचा तपास करताना त्यांच्या मातेचाही शोध घेणार असल्याची माहिती वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली.

वन्य प्राण्यांची दहशत कायम

तरवळे येथील डोंगर भागातून हा बछडा लोकवस्तीत शिरला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुमारे पाच महिन्यांचा हा मादी बछडा असून तो सुखरूप आहे. बिबट्याचा बछडा थेट घरात शिरल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन खात्याने बिबट्यांना दूर रानात हुसकावून लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fake Excise Commissioner: चक्क अर्ध्या दिवसाचा अबकारी आयुक्त बनला तोतया! कर्मचाऱ्यांनीच केला भांडाफोड; गुन्हा दाखल

India vs New Zealand T20 Series: टी-20 मालिकेपूर्वी मोठा धक्का; दोन स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर, संघात कोणाची लागणार वर्णी?

Nana Patekar Death: रात्री नाना पाटेकर एकटेच होते घरी! गोव्यातील जीवलग मित्रांना घटनाक्रम सांगताना अश्रू अनावर

Horoscope: नशिबाची साथ अन् यशाची नवी वाट! शुक्रवारी 'या' राशींची रखडलेली कामे पूर्ण होणार, महत्त्वाच्या निर्णयांत मिळणार फायदा

Neutrino Research: 'भूत-कणा'चा शोध ते औषधांच्या आरशातील रसायनांपर्यंत; नोबेल संशोधनाची अद्भुत कहाणी

SCROLL FOR NEXT