Mayor of Mormugao Municipality
Mayor of Mormugao Municipality Dainik Gomantak
गोवा

मुरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी लिओ रॉड्रिग्स बिनविरोध

दैनिक गोमन्तक

मुरगाव पालिकेच्या प्रभाग 25 चे नगरसेवक लिओ रॉड्रिग्स यांची सोमवारी बिनविरोध नूतन अध्यक्षपदी निवड झाली. निर्वाचन अधिकारी तथा नगर विकास उपसंचालक गणेश बर्वे, यांनी लिओ यांची मूरगाव पालिकेचे बिनविरोध अध्यक्ष म्हणून घोषणा केली. कारण रिक्त पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. पंचायत मंत्री मौविन गूदिन्हो आणि वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित नगराध्यक्ष लिओ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, विकासकामे आणि प्रकल्पांच्या संदर्भात मी सर्व नगरसेवकांकडे लक्ष देऊ आणि भेदभाव करणार नाही. (Leo Rodriguez unopposed for mayor of Mormugao municipality )

मुरगावच्या नगराध्यक्षपदासाठी नगरसेवक लिओ रॉड्रिग्ज यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध झाली आहे. यासंबंधी आज सोमवारी सकाळी झालेल्या मुरगाव पालिका मंडळाच्या खास सभेत निवडणूक अधिकारी व पालिका उपसंचालक गणेश बर्वे औपचारिकरीत्या त्यासंबंधी घोषणा केली. मुरगावचे नगराध्यक्ष दामोदर कासकर यांनी अलिखित करारानुसार आपल्या पदाचा राजीनामा 13 जूनला दिला होता. त्यामुळे नवीन नगराध्यक्ष निवडण्यासाठी सोमवारी (दि. 27) मुरगाव पालिका मंडळाची खास बैठक बोलाविण्यात आली होती.

नगराध्यक्ष पदासाठी लिओ रॉड्रिग्ज यांनी शुक्रवारी आपला अर्ज दाखल केला होता. रविवारी दुपारपर्यंत इतर कोणाचाही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची निवड बिनविरोध निश्चित झाली. मुरगाव पालिका मंडळात 25 पैकी 16 सदस्य सत्ताधारी गटाचे आहेत. जिंकण्यासाठी संख्याबळ नसल्याने विरोधी गटाने आपला उमेदवार उभा न करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. दरम्यान रॉड्रिग्ज यांची बिनविरोध निवड झाल्याने वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी पालिकेत येऊन अभिनंदन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: कळंगुट येथे टॅक्सी चालकाला पर्यटकांकडून मारहाण

Bicholim Volleyball League : सर्वण येथे व्हॉलिबॉल लीगला सुरवात; आठ संघांचा सहभाग

Goa Traffic Violations: वाहतूक उल्लंघन ; चार महिन्यांत ९ कोटींचा दंड वसूल

Goa Rain Update : पावसाळ्यातील आव्हानांसाठी सज्ज राहा! संदीप जॅकीस यांच्या सूचना

Panaji News : सांतिनेज खाडीतील गाळउपसा पूर्णत्वाकडे; साडेतीन किलोमीटरच्या जलप्रवाहाला पुनरुज्जीवित करणार

SCROLL FOR NEXT