Leni Digama.jpg 
गोवा

गोव्याचे 'लेनी डिगामा' ऑलिंपिक बॉक्सिंगसाठी मूल्यांकनकर्ते

दैनिक गोमन्तक

पणजी: आगामी टोकियो ऑलिंपिकमधील बॉक्सिंग स्पर्धेसाठी गोव्याचे आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी (ITO) लेनी डिगामा यांची मूल्यांकनकर्ते या जबाबदारीसाठी निवड झाली आहे. या कामगिरीसाठी निवड झालेले ते आशियातील एकमेव आहेत. (Leni Digama from goa has been selected as the evaluator for Tokyo Olympics)

कोरोना विषाणू महामारीमुळे गतवर्षी लांबणीवर पडलेली टोकियो ऑलिंपिक स्पर्धा येत्या 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होईल. लेनी गोवा बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्षही आहेत. 2012 मधील ऑलिंपिक बॉक्सिंग तांत्रिक समितीतही त्यांचा समावेश होता.

ऑलिंपिक बॉक्सिंग स्पर्धेसाठी मूल्यांकनकर्ते जबाबदारीसाठी लेनी एकमेव आशियाई आहेत, बाकी अधिकारी अमेरिका व युरोपमधील आहेत. ऑलिंपिक बॉक्सिंग रिंगमधील पंचगिरीचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी लेनी यांच्यावर असेल. स्पर्धेच्या एका बॉक्सिंग रिंगसाठी दोन मूल्यांकनकर्ते व एक निरीक्षक असतील, अशी माहिती लेनी यांनी दिली.

टोकियो ऑलिंपिकसाठी भारताचे नऊ बॉक्सर पात्र ठरले असले, तरी लेनी हे तटस्थ मूल्यांकनकर्ते असतील. साळगाव येथील 67 वर्षीय लेनी यांनी सांगितले, की ``हल्लीच मी पोलंडमधील जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेसाठी निरीक्षक होतो. मूल्यांकनकर्ता प्रत्येक कामगिरीचे मूल्यांकन करतो, त्यामुळे निरीक्षकाची कामगिरी आव्हानात्मक असते.``

लेनी यांच्यापाशी दीर्घानुभव

2012 पासून लेनी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाचे आयटीओ आहेत. त्यांनी सात जागतिक स्पर्धांत पंचगिरी केली आहे. दोन ऑलिंपिक पात्रता स्पर्धा, तसेच आशियाई, जागतिक महिला अजिंक्यपद स्पर्धेत लेनी यांनी मूल्यांकनकर्त्यांची जबाबदारी पेलली आहे.  टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतील बॉक्सिंगमधील तांत्रिक कामगिरीसाठी निवड झाल्याबद्दल गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाई, गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव गुरुदत्त भक्ता यांनी अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT