Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa GMC Issue: आरोग्यमंत्र्यांना 24 तासांचा अल्टीमेट्म; अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा डॉ. कुट्टीकरांचा इशारा

Goa GMC Doctor Suspension Issue: माझा अपमान ज्या आपत्कालीन विभागात झाला, तिथेच मंत्री राणेंनी माझी जाहीर माफी मागावी. तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही; डॉ. कुट्टीकर

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: आरोग्यमंत्री राणे यांनी रविवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. कुट्टीकर व त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली असली तरी गोवा वैद्यकीय महाविद्यालयामधील निवासी डॉक्टरांनी राणे यांच्याविरुद्धचा आपला पवित्रा कायम ठेवला आहे. २४ तासांच्या आत राणे यांनी आपत्कालीन विभागात प्रत्यक्ष येऊन जाहीर माफी मागावी अन्यथा, डॉक्टरांचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा त्यांनी सोमवारी (०९ जून) दिला.

पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांनी स्पष्ट सांगितले, "माझा अपमान ज्या आपत्कालीन विभागात झाला, तिथेच मंत्री राणेंनी माझी जाहीर माफी मागावी. तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. दरम्यान, आम्ही केवळ आपत्कालीन रुग्णांना सेवा देणार असून अन्य सेवा बंद ठेवत आहोत. मी एक डॉक्टर आहे, मी फक्त माझे कर्तव्य करत होतो. माझ्यावर सार्वजनिकरीत्या अपमानास्पद शब्दांत टीका झाली. त्यामुळे हा फक्त माझा नव्हे तर संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राचा अपमान आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री विश्वजीत राणे यांनी रविवारी रात्री डॉ. रुद्रेश यांना कठोर शब्द वापरल्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी डॉक्टरांप्रती आदर व्यक्त करत, सर्व डॉक्टरांनी पुन्हा सेवेत रुजू व्हावे, असे आवाहन देखील केले आहे.

डॉ. बांदेकर म्हणाले की, "विभागासाठी ४ विभागप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली कडक एसओपी तयार केली जाणार, आता केवळ आपत्कालीन रुग्णांचीच सेवा घेण्यात येईल आणि अनावश्यक गर्दीला परवानगी दिली जाणार नाही."

काय आहेत आंदोलक डॉक्टरांच्या मागण्या?

- आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंनी आपत्कालीन विभागात येऊन डॉ. रुद्रेश यांची माफी मागावी.

- व्हिडिओग्राफी करणाऱ्याविरुद्ध डीनने पोलिसात एफआयआर नोंदवावा.

- जीएमसीमधील व्हीआयपी संस्कृती तात्काळ बंद करावी.

आता व्हिडिओ काढण्यास बंदी

गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितले की, व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी 'गार्ड' ने केली असून, त्यासाठी आगाशी पोलिसांना बोलाविण्यात आले आहे.

दरम्यान काही निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, आपत्कालीन विभागात व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्याविरोधात 'एफआयआर' दाखल केला जाणार आहे. यापुढे आपत्कालीन विभागात फोटोग्राफी/व्हिडिओग्राफी बंद केली जाईल, तसेच पोलिस देखील तैनात राहणार आहेत.

सध्याची स्थिती

- जीएमसीमध्ये इमर्जन्सी केसेस वगळता सर्वसाधारण सेवा बंद.

- डॉक्टरांचे आंदोलन सुरु

- २४ तासांत माफी न आल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता.

- वैद्यकीय व्यवस्थापनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT