Raid in Goa Dainik Gomantak
गोवा

Raid in Goa : कमी वजनाच्या सिलिंडरची तक्रार; पर्वरीत धाडसत्र

सिलेंडरची तपासणी केली असता जवळपास 38 सिलेंडर कमी वजनाचे आणि सिलिंडरमधून गॅसचोरी करण्याची सामुग्री सापडली.

गोमन्तक डिजिटल टीम

Raid in Goa : गोव्यात कमी वजनाचे गॅस सिलिंडर ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. पर्वरी येथे आज टाकलेल्या धाडीत हा धक्कादायक प्रकार उघड झाला असून ग्राहकांनी योग्य ती काळजी घेतल्यास सदर प्रकार बंद होऊ शकतात, अशी माहिती लीगल मेट्रोलॉजी खात्याचे सहाय्यक आयुक्त अरुण पंचवाडकर यांनी दिली आहे.

पर्वरी येथील कदंबाच्या वर्कशॉपजवळच्या तळकर गॅस एजन्सीवर आज गुरुवारी सकाळी लिगल मेट्रोलोजी खात्यातर्फे सहाय्यक आयुक्त अरुण पंचवाडकर यांच्या नेतृत्वाखाली धाड टाकली. यावेळी सिलेंडरची तपासणी केली असता जवळपास 38 सिलेंडर कमी वजनाचे आणि सिलिंडरमधून गॅसचोरी करण्याची सामुग्री सापडली.

प्राप्त तक्रारीनुसार या एजन्सीच्या एक गाडीतील सिलेंडरची तपासणी करण्यापूर्वी गाडीत संशयास्पद टूल्स सापडले होते. हे टूल्स भरलेल्या सिलेंडरमधून गॅसचोरीसाठी वापरले जात असल्याने सहाय्यक आयुक्तांनी एजन्सीच्या गोडाऊनची तपासणी केली.

51 डोमेस्टिक सिलेंडरची तपासणी केली असता 38 सिलेंडर कमी वजनाचे सापडले. कंपनी मॅनेजरला सदरचे सील तोडले की ओरीजनल आहे याविषयी रिपोर्ट देण्यात विषयी सांगण्यात आले आहे. यासंदर्भात अहवाल आल्यावर पॅकेज कमोडीटी ॲक्टनुसार कडक कारवाई केली जाईल असे पंचवाडकर यांनी सांगितले.

तपासणीत सापडलेले गॅसचोरीसाठी वापरण्यात येणारे सामान जप्त करण्यात आले असून ग्राहकांना असे प्रकार आढळल्यास तक्रारीसाठी 0832-2416432 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT