Bicholim Court Slab Dainik Gomantak
गोवा

Bicholim Court Building: कोर्टात स्लॅबचा भाग कोसळला; गेल्यावर्षीपासून दुर्लक्ष

Slab Collapsed At Bicholim Court: परिणामी वकिलांसह न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना उपद्रव सहन करावा लागत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

गळतीचे ग्रहण लागलेल्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालय इमारतीच्या स्लॅबचा सिमेंटचा मोठा तुकडा आज (मंगळवारी) अचानक व्हरांड्यात कोसळला. दुपारी जेवणाच्या सुटीवेळी न्यायालयात वर्दळ कमी असताना हा प्रकार घडल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, स्लॅबचे सिमेंट कोसळलेल्या भागातील व्हरांडा सध्या ये-जा करण्यासाठी बंद केल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकाराबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. पोर्तुगीजकालीन आणि डिचोली शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेली सध्याची दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाची इमारत पूर्वी ‘त्रिब्युनल’ म्हणून ओळखली जायची. काही वर्षांपूर्वी या इमारतीची डागडुजी केली होती.

मार्च २००३ मध्ये या इमारतीला जोडून विस्तारीत इमारत बांधकाम केले आहे. मात्र, न्यायालयाची इमारत आता काहीशी कमकुवत झाली आहे. या इमारतीच्या छपरातून पावसाचे पाणी झिरपत आहे. परिणामी वकिलांसह न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना उपद्रव सहन करावा लागत आहे.

विधानसभेत विषय मांडूनही दुर्लक्ष

गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनात आमदार प्रेमेंद्र शेट यांनी या न्यायालय इमारतीचा मुद्दा उपस्थित केला होता. सरकारने या इमारतीची स्थैर्यता तपासावी. तसेच डागडुजी करावी. आवश्यकता भासल्यास नवी बांधावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावेळी इमारतीची पाहणी करण्याचे आदेश तत्कालीन साबांखा मंत्री नीलेश काब्राल यांनी अधिकाऱ्यांना दिले. लागलीच अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी करून जागेचे मोजमाप घेतले. मात्र, त्यानंतर पुढे कोणत्याच हालचाली झाल्याचे दिसून आले नाही.

भ्रष्ट कंत्राटदारावर गुन्हा नोंदवा; पाटकर

मेरशी येथील नव्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीचे कंत्राट तब्बल १२० कोटींचे होते; परंतु उद््घाटनापूर्वीच इमारतीवरील पत्रे उडाले. भ्रष्ट एमव्हीआर कंत्राटदारावर सरकारने गुन्हा नोंदवावा, अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

SCROLL FOR NEXT