Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police : वकील मारहाण प्रकरण भोवलं; चार पोलिस कर्मचारी निलंबित; चौकशीची टांगती तलवार कायम

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले चौकशीचे आदेश

दैनिक गोमंतक

अ‍ॅड. गजानन सावंत यांना पर्वरी पोलिसांकडून मारहाण झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. काही दिवस उलटले तरी देखील संशयितांना अटक झाली नसल्याने राज्यातील ॲडव्होकेट्स असोसिएशनच्यावतीने धरणे आंदोलन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज चार पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

(Lawyer Gajanan Sawant attack case Accused police suspended)

मिळालेल्या माहितीनुसार मारहाण प्रकरणी अटकेसाठी ॲडव्होकेट्स असोसिएशनने प्रशासनाने आरोपी पोलिस कर्मचाऱ्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे. तसेच पोलीस या प्रकरणात जाणीवपुर्वक चालढकल करत आहेत. असा आरोप देखील असोसिएशनने केला आहे.

असोसिएशनच्या दबाव तंत्राला आता यश आले असून चार पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये पर्वरी पोलीस स्थानकातील हवालदार संदीप परब, पोलीस कॉन्स्टेबल महादेव नाईक, अमृत नागवेकर, मार्कुस गोम्स यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे आणखी कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.

'' 'त्या' चार पोलिसांवर कारवाई करा''

दिनांक 12 डिसेंबर रोजी वास्को अ‍ॅडडव्होकेट असोसिएशन व्यवस्थापकीय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अ‍ॅड. गजानन सावंत यांच्यावर झालेल्या क्रूर हल्ल्याचा वकिलांनी तीव्र निषेध केला. व सावंत यांच्यावरील हल्ल्यात सहभागी असलेल्या चार पोलिसांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच सर्व बाबतीत तपास पूर्ण होईपर्यत त्यांना निलंबीत करण्यात यावे अशी मागणी केली आहे. या प्रकरणात आज चार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

Goa Water Metro Project: 'प्रकल्प नेमका कुणासाठी?' वॉटर मेट्रोच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT