Goa Police  Dainik Gomantak
गोवा

Lawrence Bishnoi Gang : कुख्यात बिष्णोई टोळीतील पवन सोळंकी याला गोव्यात अटक

जोधपूर लुटमारप्रकरणी कॅसिनोमधून अटक

दैनिक गोमन्तक डिजिटल

Lawrence Bishnoi Gang : जोधपूर येथील जेसाराम याच्या कार्यालयात घुसून त्याचे हातपाय बांधून व मारहाण करून लॉरेन्स बिष्णोई टोळीने लाखो रुपयांची लूट केल्याप्रकरणी ‘वाँटेड’ असलेल्या अट्टल गुन्हेगार पवन सोळंकी याला पणजी पोलिसांनी सरदार पुरा पोलिसांच्या मदतीने कॅसिनोवर जुगार खेळण्यासाठी गेला असता त्याला शिताफीने अटक केली.

सरदार पुरा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन जोधपूरला रवाना झाले, अशी माहिती पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली. संशयित पवन सोळंकी हा लॉरेन्स बिष्णोई टोळीचा सदस्य आहे.

या टोळीच्या म्होरक्याच्या इशाराऱ्यानुसार जोधपूरमध्ये खंडणीवसुली तसेच लुटमार व चोऱ्यांचे प्रकार सुरू आहेत. 4 मार्च रोजी या टोळीच्या काही सदस्यांनी तोंडाला मास्क लावून जेसाराम याच्या कार्यालयात प्रवेश केला होता.

मारहाण करून त्याचे हातपाय बांधले व कार्यालयातील रोकड लुटली होती. सरदार पुरा पोलिसांनी याप्रकरणी टोळीतील काहींना अटक केली होती, मात्र पवनने पळून गोव्यात आश्रय घेतला होता. त्याचा शोध घेत सरदार पुरा पोलिसांना तो कॅसिनोवर जुगार खेळण्यास जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind Vs NZ T20: चौथ्या T20 साठी 2 बदल? संजू सॅमसन, कुलदीपबाबत मोठा निर्णय; कोण असणार अंतिम संघात?

Goa Politics: खरी कुजबुज; गोवा दूध उत्पादक संघ जीवंत आहे का?

Goa News: 2050 पर्यंत गोव्‍यात 100% नवीकरणीय ऊर्जा! CM सावंतांचे प्रतिपादन; कॅनडा, जपान, दक्षिण कोरियाशीही सहकार्य करार

Goa Politics: गोवा काँग्रेसची राहुल गांधी, खर्गेंसोबत मीटिंग! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत चर्चा

Goa News: सरकारी, सार्वजनिक भूखंडांवर राहणार आता कडक नजर! तालुकानिहाय पथके स्थापन; सुट्ट्यांच्या दिवशीही कडक देखरेख

SCROLL FOR NEXT