Vijai Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: स्टेडियमसाठी कोट्यवधी खर्च, जमीन दिली त्या गोमंतकीयांना काहीच नाही; त्यांना मालकी हक्क द्या, सरदेसाईंची मागणी

Goa Assembly Budget Session: ज्या मूळ गोमंतकीय कुटुंबांनी ही जमीन दिली, त्यांच्यावर सरकारने कोणताही खर्च केलेला नाही, अशी खंत आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत व्यक्त केली.

Sameer Panditrao

Goa Assembly Budget Session 2025

पणजी: माझ्या मतदारसंघात राज्यातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. त्याच्या उभारणीत कोट्यवधींचा खर्च झाला. मात्र, ज्या मूळ गोमंतकीय कुटुंबांनी ही जमीन दिली, त्यांच्यावर सरकारने कोणताही खर्च केलेला नाही, अशी खंत आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत व्यक्त केली.

दरम्यान, या सहा मूळ गोमंतकीय कुटुंबांना राहत असलेल्या जमिनीचा मालकी हक्क देण्यात यावा. सरकारने केवळ विकासावरच लक्ष केंद्रित न करता, त्या विकासात योगदान दिलेल्या लोकांचीही काळजी घेतली पाहिजे, असे सरदेसाई म्हणाले.

गोव्यात वेगवेगळ्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे पुतळे मोठ्या प्रमाणावर उभारले जात आहेत. याकडे लक्ष वेधत सरदेसाई म्हणाले की, सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला होता. ते आमच्यासाठी दैवतासारखे आहेत. त्यामुळे गोव्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पुतळ्यांसाठी योग्य धोरण तयार करावे, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.

‘पर्यटन घटले, जबाबदार कोण?’

पर्यटनाच्या घटत्या प्रमाणावर भाष्य करताना विजय सरदेसाई यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी पर्यटन घटल्याचे मान्य केले आहे, पण पर्यटनमंत्री मात्र ते मान्य करायला तयार नाहीत. किनारी भागात वाढणाऱ्या दादागिरीमुळे पर्यटक गोव्यात यायला घाबरत आहेत, असा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT