Large crowd at the Kala Akadami to hear the Goa Coastal Area Management Plan
Large crowd at the Kala Akadami to hear the Goa Coastal Area Management Plan 
गोवा

गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखड्याच्या सुनावणीसाठी कला अकादमीत मोठी गर्दी

गोमन्तक वृत्तसेवा

पणजी : पणजी येथील कला अकादमीमध्ये किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन आराखडा वरील सुनावणीसाठी आज उत्तर गोव्यातून मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली आहे. गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या जाहिरातीमध्ये लोकांना जे सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे सूचना केल्यानंतर आज नोंदणी केलेल्या लोकांना सुनावणीस आतमध्ये सोडण्यात आले नाही त्यामुळे अनेकांनी त्यांचा विरोध केला आहे. या सुनावणीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

ही सुनावणी आज दिवसभर संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे मात्र अजूनही मुख्य सुनावणीला सुरूवात झालेली नाही. काही कोकणीतून आलेल्या तक्रारींचे अनुवाद करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. गोवा फाऊंडेशनचे संचालक क्लॉड आल्वारीस यांनी सांगितले की आज सुनावणीसाठी उपस्थित राहिलेल्या लोकांची नोंदणी करून घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे त्यामुळे लोक संतापले आहेत ही सुनावणी रद्द करावी नाही तर सगळ्यांना सुनावणीला  उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आईसाठी 7 वर्षांची मुलगी ठरली 'देवदूत'; सतर्कता दाखवत वाचवला जीव

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT