Court Canva
गोवा

Goa TCP Fee: ‘टीसीपी’ने जुने शुल्क आकारल्याची 46 प्रकरणे उघड; याचिकादारास पडताळणीचे खंडपीठाचे निर्देश

Land conversion fee Goa: सरकारने सादर केलेल्या यादीची पडताळणी करून माहिती देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ही सुनावणी १८ मार्चपर्यंत तहकूब केली.

Sameer Panditrao

Land conversion charges TCP

पणजी: राज्यातील भू रुपांतरण व क्षेत्रबदलासाठी सरकारने नव्याने अधिसूचना जारी करून शुल्क निश्‍चित केले असताना जुन्या अधिसूचनेनुसारच शुल्क आकारणी केल्याची आणखी ४६ प्रकरणे उघडकीस आली आहेत. सरकारने सादर केलेल्या यादीची पडताळणी करून त्यात आणखी काही प्रकरणे आहेत का, याची माहिती याचिकादाराला देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ही सुनावणी १८ मार्चपर्यंत तहकूब केली.

मागील सुनावणीवेळी राज्य सरकारने जुन्या अधिसूचनेनुसार शुल्क आकारणी केलेली सुमारे १४० प्रकरणांमध्ये जमीन रुपांतर तथा क्षेत्रबदलासाठी शुल्क आकारणी झाली आहे त्यासाठी संबंधितांना नोटीस बजावून थकबाकी वसूल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली होती.

आज ही जनहित याचिका सुनावणीस आली असता खंडपीठाने याचिकादाराला सरकारने दिलेल्या यादीमध्ये काही तफावत आहे का, याची माहिती द्यावी, असे स्पष्ट केले. नव्या शुल्कानुसार जमीन रुपांतरण किंवा क्षेत्रबदलासाठी प्रत्येक चौ. मी. जमिनीसाठी १ हजार रुपये दर सरकारने निश्‍चित केला असताना त्याऐवजी २०० रुपये शुल्क आकारण्यात येत असल्याचे याचिकादाराने खात्याच्या उघडकीस आणून दिल्यावर त्यांचे डोळे उघडले होते.

‘त्या’चुकीची प्राथमिक चौकशी सुरू!

नगर व शहर नियोजन खात्याने नव्या सुधारित शुल्कासंदर्भातची अधिसूचना जारी केली त्यानंतरही काही जणांनी जमीन रुपांतरण व क्षेत्रबदलासाठी केलेल्या जमिनीसाठी जुन्या अधिसूचनेनुसार शुल्क आकारणी केल्याचे लक्षात आल्यावर यासंदर्भात दक्षता खात्यामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच ही थकबाकी वसूल केली जात आहे. या झालेल्या चुकीची प्राथमिक चौकशी सुरू असून खंडपीठाने त्याचा अहवाल सादर करण्यासाठी आठ आठवड्याची मुदत दिली आहे. या वेळेत चौकशी अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

Goa Politics: मंत्रीपद देतो म्हटलं की धावत येतील, विरोधकांच्या एकीचा उपयोग होणार नाही, 2027 मध्ये गोव्यात भाजपचीच सत्ता; विश्वजीत राणे

Cricket Controversy: "आपसी रंजिश, गुस्सा और खराब भाषा..." ज्युनियर्सवर हल्ल्याच्या आरोपानंतर बांगलादेशी कर्णधाराचा मोठा खुलासा, पोस्ट करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT