SUREL TILVE Dainik Gomantak
गोवा

Pernem News : पेडणे तालुक्यातील जमीन रूपांतराबाबत मगोने भूमिका स्पष्ट करावी : सुरेल तिळवे

पेडणे जमीन रूपांतर आराखडा हा या सरकारचा सर्वात मोठा घोटाळा असून सरकार पेडण्याची जमीन श्रीमंतांच्या घशात घालत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem News : पणजी, पेडणे तालुक्यातील जमीन रूपांतर विकास आराखड्याच्या बाबतीत स्थानिक आमदार जीत आरोलकर विरोधी भूमिका घेऊन आंदोलन करत असताना

मगोपचे नेते सुदिन ढवळीकर या जमीन रूपांतराचे समर्थन करतात याचा अर्थ ढवळीकर ‘जोकर’ची भूमिका बजावत आहेत, अशी टीका ‘आप’चे नेते ॲड. सुरेल तिळवे यांनी केली आहे.

ॲड. तिळवे म्हणाले, पेडणे जमीन रूपांतर आराखडा हा या सरकारचा सर्वात मोठा घोटाळा असून सरकार पेडण्याची जमीन श्रीमंतांच्या घशात घालत आहे.

याला स्थानिकांचा जोरदार विरोध असून स्थानिक आमदार जीत आरोलकर हा आराखडा कायमचा रद्द करावा, या मागणीसाठी आंदोलन करत आहेत.

याउलट त्यांच्याच पक्षाचे नेते आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर आमदार आरोलकर यांच्या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेत असून जमीन रूपांतराचे समर्थन करत आहेत.

ढवळीकर बंधू नेहमी सत्तेसोबत राहण्याच्या प्रयत्नात असतात. निवडणुकांमध्ये ज्या पक्षाला ते व्यासपीठावरून शिव्याशाप देतात, त्यांच्याच पक्षासोबत ते सत्तेत सहभागी होतात.

हा गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. आता त्यांनी ही भूमिका सोडून द्यावी, अन्यथा लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. त्यांची ही ‘जोकर’ची भूमिका त्यांना महागात पडेल.

- ॲड. सुरेल तिळवे, ‘आप’चे नेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT