Nuisance on Arambol Beach  Dainik Gomantak
गोवा

Arambol Beach: किनाऱ्यावर विक्रेत्यांचा वाढता उपद्रव

Arambol Beach: लमाणी विक्रेत्यांचा घोळका भंडावून सोडत असल्याने पर्यटकांत तीव्र नाराजी

गोमन्तक डिजिटल टीम

Arambol Beach: किनारी भागात पर्यटन हंगामाची सांगता झाली असली तरी पावसाळी पर्यटनही तितकेच जोरात आहे. सध्या ‘ऑफ सिझन’मध्ये देशी पर्यटक गोव्याला पसंती देत असतात,मात्र लमाणी फिरत्या विक्रेत्या बायकांचा घोळका अक्षरशः भंडावून सोडत असल्याने पर्यटकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सध्या पावसाळी पर्यटन चालू असून, देशी पर्यटक मोठ्या संख्येने उतरत असल्याचे चित्र आहे. त्याच्या गाड्या पार्क करण्यापूर्वीच लमाणी बायका व त्यांची लहान मुले त्याच्या गाड्यांभोवती घोळका करत असतात.

त्या विक्रेत्यांना पाहून पर्यटनाची मजा अनुभवण्यास मिळत नसल्याचे पर्यटक नाराजी व्यक्त करतात. अनेकदा या बाबतीत तक्रारी करूनही ऐकत नसल्याने, पर्यटकांची गोची होत असल्याचे समजते. बरे,गाडीतून उतरताना नको म्हटले तरी शेवटपर्यंत त्याचा पिच्छा सोडत नसल्याने पोलिसांच्या नावाने शंख करून पर्यटक नाराजीने परतत असतो.

या भागात पर्यटन हंगामात अशीच स्थिती होती,अनेकदा स्थानिक व्यावसायिकांनी आवाज उठवूनही पोलिसांनी काहीच कारवाई केली नव्हती.त्यामुळे सध्या पोलिसांकडून मोठी अपेक्षा नसली तरी त्यांच्या बाबतीत वेगळीच चर्चा सुरू असते.त्या चांगल्यापैकी मलिदा देत असल्याने पोलिस कारवाई करण्यास धजावत नसल्याची चर्चा आहे.

पोलिसांवर ‘टार्गेट’ची जबाबदारी

पर्यटन हंगामात पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत असल्याचे चित्र दिसते.पोलिसांना,वरिष्ठांची किंवा कोणाची तरी ‘टार्गेट’ पूर्ण करण्याची जबाबदारी घ्यावी लागते. मात्र, पोलिस दलाची बेअब्रू होत असते,त्यास नेमके कोण जबाबदार, हा प्रश्न असतो.तरी पोलिसांनी स्वच्छ ‘इमेज’ बनवण्यासाठी ठोस उपाययोजना करावी,अशी मागणी व्यावसायिक व ग्रामस्थांतून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Robbery: भामट्यांचा 'खाकी'वरच डाव, पण 'नव्या'ला 'जुना' नडला! निवृत्त ASI च्या सतर्कतेने तोतया पोलिसांचा बेत फसला; डिचोलीत खळबळ

Morjim Turtle Conservation: पर्रीकरांचे स्वप्न वन खात्याच्या दुर्लक्षामुळे अधांतरी! तेमवाडा कासव संवर्धन केंद्राची दुरवस्था; निसर्गप्रेमींमध्ये संताप

Goa Crime: बाजारात पार्क केलेल्या टेम्पोत आढळला 55 वर्षीय महिलेचा मृतदेह; खुनाचा संशय, पोलिस, फॉरेन्सिक पथक दाखल

Canacona Beach: पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे! नोंदणी नसलेले वॉटर स्पोर्ट्स अन् डॉल्फिन राईड्सचा काणकोणात हैदोस; माफीयांचे वाढले वर्चस्व

Goa Today Live Updates: घर रिकामे करण्याच्या नोटीसची गोवा मानवाधिकार आयोगाकडून दखल; सुकूर पंचायतीच्या सचिवांना समन्स

SCROLL FOR NEXT