Harmal News : हरमलमध्ये विदेशी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; युगांडाच्या महिलेस अटक

Harmal News : दोघींची सुटका ‘अर्ज’ च्या मदतीने मांद्रे पोलिसांची कारवाई
Harmal
Harmal Dainik Gomantak

Harmal News :

पेडणे, मांद्रे पोलिसांनी आज (शनिवारी) आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला असून याप्रकरणी हरमल येथे हा कुंटणखाना चालविणाऱ्या युगांडातील जो जो ना किंटू या संशयित महिलेस मांद्रे पोलिसांनी अटक केली असून दोन महिलांची सुटका करून त्यांची मेरशीत ‘अपना घर’ मध्ये रवानगी केली आहे.

पेडणे पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी आणि ‘अर्ज’ या ‘एनजीओ’ च्या सहकार्याने मांद्रे पोलिसांनी ही कारवाई केली.

पेडणे पोलीस उपअधीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, युगांडातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि गरजू महिलांना गोव्यातील रेस्टॉरंट्स आणि कॅफेमध्ये नोकरीचे खोटे आश्वासन देऊन सेक्स रॅकेट चालविणारे भारतात आणत असत.त्यानंतर हे तस्कर तरुणींना धमकावून त्यांच्याकडून पासपोर्ट आणि व्हिसा बळजबरीने काढून घेत. धमक्या व मारबडव करुन वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत असत.

उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल व पेडणे पोलीस अधिक्षक जीवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली मांद्रे पोलिस स्थानकाचे निरीक्षक शेरीफ जॅकिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. दरम्यान, हरमल किनारी भागात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्यांची चौकशी करावी,अशी मागणी होत आहे.

Harmal
Goa News : भाजप प्रदेशाध्यक्षपदी दयानंद सोपटे यांच्या नावावर खल; दिल्लीतील बैठकीत चर्चा

पीडितेने दुतावासाशी संपर्क साधल्याने प्रकार उघड

रॅकेट चालवणाऱ्या जोजो ना किंटू हिचा एक गट ऑनलाईन माहिती देऊन तसेच हरमल समुद्रकिनाऱ्यावर व मोक्याच्या ठिकाणी उभे राहून गिऱ्हाइक शोधत असे. पीडितांपैकी एका युवतीने आपल्या दूतावासाशी संपर्क साधून त्यांच्यावर आलेला प्रसंग सांगितला.

दूतावासाने याची माहिती पोलिस व ‘एनजीओ’ना दिल्यामुळे पोलिसांना पीडितांवर अत्याच्यार होत असलेल्या हरमल येथील जागेपर्यंत पोहचणे सोपे झाले.पोलिसांनी कलम ३७० आणि अनैतिक (प्रतिबंध) कायद्याच्या कलम ४ ,५ ,७ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com