Lakhimpur Kheri Case: Goa Congress Leader Dainik Gomantak
गोवा

Lakhimpur Kheri Case: गोवा काँग्रेसच्या वतीने आझाद मैदानावर मूक आंदोलन

या आंदोलनाला गोव्यातूनही चांगला प्रतिसाद मिळाला. मौनव्रत धारण करत केंद्र सरकारचा गोवा काँग्रेसने निषेध केला

दैनिक गोमन्तक

लखीमपूर खेरी प्रकरणी (Lakhimpur Kheri Case) केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काल देशभरात कॉंग्रेसच्या (Congress) वतीने मूक आंदोलन करण्यात आले. लखनौत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी मूक आंदोलनात सहभाग घेतला होता. 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अजय मिश्रा यांचे चिरंजीव आशिष मिश्रा यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी शनिवारी रात्री अटक करण्यात आली आहे. लखनौतील जीपीओ पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर कॉंग्रेस नेत्यांनी मौन व्रत केले होत.

दरम्यान या आंदोलनाला गोव्यातूनही (GOa) चांगला प्रतिसाद मिळाला. उत्तर प्रदेशातील (UP) लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांवर (Farmers) झालेल्या अत्याचाराच्या विरोधात गोवा काँग्रेसच्या (Goa Congress) वतीने गोव्यातील ऐतिहासिक आझाद मैदानावर मौनव्रत धारण करत केंद्र सरकारचा निषेध सुरू केला होता. या निषेधात काँग्रेसचे सरचिटणीस पी चिदंबरम, गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी मुख्यमंत्री फ्रान्सिस्को सर्दिना उपस्थित होते.

देशात या ठिकाणी हे आदोलन काही प्रमाणात यशस्वि होतांना दिसलं

लखीमपूर खेरी प्रकरणी दिल्ली र्कांग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी दिल्लीच्या नायब राज्यपालाच्या कार्यालयाबाहेर मौन व्रत केले. यावेळी त्यांनी अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनात दिल्ली कॉंग्रेसचे अध्यक्ष अनिलकुमार चौधरी, माजी केंद्रीय मंत्री अश्‍विनीकुमार, कृष्णा तीरथ आदी सहभागी झाले होते.

राजस्थान: जयपूर येथे मूक आंदोलनादरम्यान कॉंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर आले. एकीकडे कॉंग्रेस कार्यकर्ते लखीमपूर खेरीप्रकरणी मौन व्रत करत असताना भाजपचे कार्यकर्ते ‘रिट’ पेपर लिकप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करत होते.

पंजाब: अमृतसर रेल्वे स्थानकावर मौन व्रत आंदोलन. प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू वैष्णोदेवीला गेल्याने सहभागी झाले नसल्याची माहिती.

उत्तराखंड: पिठोरागड युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऋषेश महर यांनी कार्यकर्त्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मौन व्रत केले. तत्पूर्वी त्यांनी अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

पश्‍चिम बंगाल: प्रदेशाध्यक्ष अधीररंजन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कोलकता येथे आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक केली. कॉग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत अजय मिश्रा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT