Lairai Devi  Gomantak Digital Team
गोवा

Lairai Devi Jatra Utsav : लईराई देवीची जत्रा, मिलाग्रीस सायबिणीचे फेस्त एकाच दिवशी!

हिंदू व ख्रिश्चन बांधवांसाठी ही एक पर्वणीच...

गोमन्तक डिजिटल टीम

Lairai Devi Jatra Utsav : येथील सेंट जेरोम चर्चमध्ये मिलाग्रीस सायबिणीचे फेस्त तसेच शिरगाव येथील श्री देवी लईराईची जत्रा एकाच दिवशी साजरी होणार आहे.24 एप्रिल रोजी13 वर्षांनंतर यंदा हा फेस्त आणि जत्रा एकाच दिवशी येण्याचा हा सुवर्ण योग आला.

श्री लईराई देवी व मिलाग्रीस सायबीण या दोन्ही सख्ख्या बहिणी असल्याची भाविकांत श्रद्धा आहे. फेस्ताच्या दिवशी मिलाग्रीस सायबिणीला शिरगावहून देवस्थानतर्फे तेल, तर म्हापशाहून लइराई देवीला जत्रेच्या दिवशी सेंट जेरॉम चर्चतर्फे मोगरीची फुले भेट म्हणून पाठविली जातात.

ईस्टरच्या सणानंतर, तिसऱ्या सोमवारी दरवर्षी मिलाग्रीस सायबिणीचे फेस्त साजरे केले जाते. या फेस्ताच्या कालावधीतच देवी लईराईची जत्रा साजरी केली जाते. मात्र, यंदा जत्रा आणि फेस्त एकाच दिवशी साजरी होण्याचा सुवर्ण योग क्वचितच येतो. यापूर्वी 19 एप्रिल2010 रोजी एकाच दिवशी फेस्त आणि जत्रा साजरी झाली होती.1970 च्या दशकानंतर,2010 मध्ये म्हणजे 40 वर्षांनंतर फेस्त आणि जत्रा एकाच दिवशी साजरी झाली होती.

हिंदू-ख्रिश्चन बांधवांसाठी पर्वणी

देवी लईराई व मिलाग्रीस सायबिणीचे फेस्त हे एकाच दिवशी आल्याने भक्तांसाठी हा सुवर्ण योग मानल जात आहे.. देवी लईराई व मिलाग्रीस सायबिण या दोन्ही सख्ख्या बहिणीच. आणि दोन्ही बहिणींचा उत्सव एकाच दिवशी येणे म्हणजे, हिंदू व ख्रिश्चन बांधवांसाठी ही एक पर्वणीच. हा दिवस गोमंतकीयांसाठी आनंदोत्सवच आहे, असे म्हापशातील विठ्ठल-रखुमाई देवस्थानचे अध्यक्ष तुषार टोपले यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: बेपत्ता राजवीर सापडला; काणका पर्रा येथे लागला शोध

Saint Xavier Exposition: मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूताने घेतले संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाचे दर्शन; गोव्याचे केले विशेष कौतुक

Cash For Job: संशयितांच्या मालमत्तेची चौकशी करा! पोलिसांची शिफारस; कोट्यवधींची अफ़रातफर उलगडणार?

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT