Cash For Job: संशयितांच्या मालमत्तेची चौकशी करा! पोलिसांची शिफारस; कोट्यवधींची अफ़रातफर उलगडणार?

Goa Crime: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातलेल्या जुने गोवे येथील संशयित पूजा नाईक हिला म्हार्दोळ पोलिसांनी अटक केल्यानंतर गेली अनेक वर्षे पैसे देऊनही सरकारी नोकरी न मिळालेल्या राज्यातील इतरांनी तसेच मध्यस्थी केलेल्यांनी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या होत्या.
Cash For Job Scam, Goa Government Job Scam, Goa Job Fraud
Cash For Job ScamDainik Gomantak
Published on
Updated on

Cash For Job Scam

पणजी: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातलेल्या जुने गोवे येथील संशयित पूजा नाईक हिला म्हार्दोळ पोलिसांनी अटक केल्यानंतर गेली अनेक वर्षे पैसे देऊनही सरकारी नोकरी न मिळालेल्या राज्यातील इतरांनी तसेच मध्यस्थी केलेल्यांनी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या होत्या.

या प्रकारानंतर इतरही पोलिस स्थानकात अशाच प्रकारच्या तक्रारी दाखल झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत त्याची पाळेमुळे शोधण्यास सुरुवात केली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फसवणूक झालेल्यांना तक्रारी दाखल करण्याचे आश्‍वासन केल्यानंतर अनेकजणांनी पोलिसांत तक्रारी दिल्या होत्या. विविध तक्रारींनुसार पोलिसांनी पूजा नाईक, प्रिया यादव, दीपश्री सावंत आणि श्रुती प्रभुगावकर यांच्यासह अनेकांना अटक केली होती. या संशयित महिलांच्या उत्पन्नाचा स्रोत तसेच त्यांच्याकडे असलेली स्थावर व जंगम मालमत्ता यांचीही चौकशी करण्याची शिफारस पोलिसांनी सक्तवसुली खात्याकडे केली आहे.

म्हार्दोळ पोलिसांनी संशयित पूजा नाईक हिला अटक केल्यानंतर तिच्याकडे असलेल्या अलिशान गाड्या जप्त केल्या होत्या, तसेच बँक खात्यावरील रक्कम लाखो रुपयांची रक्कम गोठवली होती. या गुन्ह्यानंतर तिला डिचोली, पर्वरी व पणजी पोलिस स्थानकात दाखल झालेल्या गुन्ह्यात बदली वॉरंटवर ताब्यात घेऊन अटक केली. तिच्याविरुद्ध चौकशी सुरू असताना तिचा साथीदार व दलाल म्हणून काम करणाऱ्या श्रीधर सतरकर याने लोकांकडून पैशांची होणाऱ्या मागणीमुळे आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्याच्या पत्नीने म्हार्दोळ पोलिस स्थानकात तक्रार दाखल करून पूजा नाईक हिनेच सतरकर याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित पूजा नाईकने २०१२ ते २०२४ या काळात अनेकांना सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींचा गुंडा घातला आहे. २०१२ - १३ या काळात ती एका प्रादेशिक पक्षाच्या कार्यालयात कार्यरत होती. त्यामुळे तिच्या अनेक आमदार, खासदार तसेच मंत्र्यांशीही ओळख झाली होती. त्या ओळखीचा फायदा घेत तिने काहींना नोकऱ्याही मिळवून दिल्याची चर्चा सुरू आहे.

Cash For Job Scam, Goa Government Job Scam, Goa Job Fraud
एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

कोट्यवधीचा गंडा

पोलिसांनी यासंदर्भात कोणतीच माहिती संशयित पूजा नाईक हिने दिली नसल्याचे सांगून नामानिराळे झाले आहेत. तिने नोकऱ्या लावण्यासाठी केलेला बहुतेक प्रकरणांमध्‍ये रोख रकमेने व्यवहार केला आहे. त्यामुळे तिने किती कोट्यवधीचा गंडा घातला याचा तपास लावण्यात कठीण होत आहे. या फसवणुकीच्या माध्यमातूनच तिने ही मोठ्या प्रमाणात माया गोळा केली होती व अलिशान पद्धतीने जगत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com