Mogariche kale Dainik Gomantak
गोवा

Lairai Devi Jatra Utsav : लईराई देवीला मोगरीचे कळे प्रिय; आतापासूनच विक्री सुरू

आवक वाढणार : यंदा मोगरीच्‍या वेलींना चांगला बहर; शिरगावात कौलोत्‍सवापर्यंत सहा दिवस होणार विक्री

दैनिक गोमन्तक डिजिटल

यंदा मोगरीच्या वेलींना चांगला बहर आलेला आहे. त्‍यामुळे श्री लईराई देवीच्या जत्रोत्‍सव काळात शिरगावात प्रचंड प्रमाणात मोगरीचे कळे उपलब्ध होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

येत्या सोमवारी श्री लईराई देवीचा जत्रोत्‍सव साजरा होणार आहे. मात्र आतापासूनच मोगरीचे कळे मोठ्या प्रमाणात विक्रीस उपलब्ध होऊ लागले आहेत. दरवर्षी जत्रा ते कौलोत्सवादरम्यान सहा दिवस शिरगावात मोगरीचे कळे विक्रीस उपलब्ध होत असतात.

यंदा मोगरींना चांगला बहर आल्याने कळ्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. फूलविक्रेत्यांच्या चेहऱ्यावरही समाधान दिसून येत आहे.

शिरगावातील श्री लईराई देवी म्हटली की सुवासिक मोगरीच्या कळ्यांची आठवण येतेच. मोगरीचे कळे श्री लईराई देवीला प्रिय, अशी प्रत्येक भक्ताची भावना आहे आणि म्हणूनच देवीच्या दर्शनासाठी येणारे भाविक मोगरीचे कळे देवीच्या चरणी अर्पण करतात.

काही भक्तगण नवस बोलल्यानुसार ठराविक कळ्यांच्या माळा देवीला अर्पण करतात. जत्रेदिवशी धोंड भक्तगणही मोगरीच्या माळा गळ्यात घालतात. जत्रा ते कौलोत्सवापर्यंत मोगरीच्या कळ्यांना प्रचंड मागणी असते.

मोगरीचा दरवळ; लाखोंची उलाढाल

जत्रोत्‍सवाच्‍या काळात दरवर्षी अस्नोडा बसस्थानक ते श्री लईराई देवीच्‍या मंदिरापर्यंत पावलोपावली मोगरीचे कळे विक्रीस उपलब्ध असतात. गोव्यासह शेजारच्या राज्यांतून मोगरीच्या फुलांची आवक होत असते.

जत्रा काळात शिरगावात मोगरीच्या फुलांचा दरवळ पसरत असतो. या फुलांना असलेली मागणी पाहता जत्रा काळात शिरगावात मोगरी फुलांच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Forex Reserve Record: भारताच्या परकीय चलन साठ्याने रचला इतिहास! फॉरेक्स रिझर्व्ह 785 अब्ज डॉलर पार; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?

Horoscope 12 September 2026: सूर्याचं नक्षत्र बदलताच 'या' राशींचं चमकणार भाग्य, शनिवार ठरणार वरदान; होणार अफाट धनलाभ

Mapusa Coconut Price: महागाईत गणेशोत्सवाचा आनंद वाढला! म्हापशात अवघ्या 2 रुपयांत नारळ; दोन दिवसांत तब्बल 9 ते 10 हजार नारळांचे वाटप

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

SCROLL FOR NEXT