Lairai Devi Jatra Utsav : धोंडांचे ‘सोवळे’ व्रत सुरू; शिरगावात उत्‍साह

श्री लईराई देवीचा प्रसिद्ध जत्रोत्‍सव सोमवारी
Lairai Devi Jatra Utsav
Lairai Devi Jatra UtsavDainik Gomantak
Published on
Updated on

शिरगाव येथील प्रसिद्ध श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवानिमित्त धोंड भक्तगणांच्या सोवळ्या व्रतास प्रारंभ झाला आहे. डिचोली तालुक्यातील बहुतांश गावांत धोंड कडक व्रत पाळताना दिसून येत आहेत.

देश-विदेशापर्यंत ख्याती आणि लाखो भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेल्या लईराई देवीचा जत्रोत्सव यंदा सोमवार दि. 24 एप्रिल रोजी साजरा होत आहे.

या जत्रोत्‍सवानिमित्त गुरुवारपासून धोंड भक्तगणांनी परंपरेप्रमाणे कडक व्रत पाळण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्यात मोठा उत्साह दिसून येत आहे.

लहान-थोरांसह नवीन धोंड भक्तगणही व्रत पाळत आहेत. काही ठिकाणी महिला धोंडही आहेत. धोंड भक्तगणांच्या व्रतामुळे गावोगावी मंगलमय व भक्तिमय वातावरण पसरले आहे.

Lairai Devi Jatra Utsav
Rohan Khaunte : हॉटेल व्यवस्थापनातून रोजगार संधी शक्य ; पर्यटन हब करण्याचा सरकारचा विचार

श्री लईराई देवीचे धोंड भक्तगण राज्‍यात गावोगावी विखुरलेले आहेत. डिचोली तालुक्यातील म्हावळिंगे, कुडचिरे, कारापूर, सर्वण, मये, हातुर्ली, नार्वे आदी बहुतांश भागात देवीचे धोंड आहेत. रविवारपासून सर्वत्र कडक व्रतास सुरुवात झाली आहे.

गुढीपाढव्यापासून म्हणजेच जत्रेच्या आधी महिनाभर धोंड भक्तगण शाकाहार पाळतात. तर, जत्रेला पाच दिवस असताना कडक सोवळे व्रत पाळले जाते.

रविवारी होणार ‘व्हडले’ जेवण

काही ज्येष्ठ धोंड भक्तगण तीन दिवस असताना सोवळे व्रत पाळतात. मंदिर वा नैसर्गिक तलाव आदी पवित्र ठिकाणी एकत्रित येऊन धोंड भक्तगणांच्या व्रताला सुरूवात होते.

व्रतस्थ काळात हे धोंड स्नान करून ओले राहूनच ‘श्री लईराई माता की जय’ असा जयघोष करतात व आहार घेतात. जत्रेच्या आदल्या रात्री व्रतस्थ ठिकाणी ‘व्हडले’ जेवणाचा कार्यक्रम होतो. यंदा रविवार दि. 23 एप्रिल रोजी ‘व्हडले’ जेवण होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com