Lairai Devi Jatra Dainik Gomantak
गोवा

Lairai Devi Jatra: लईराई देवीचे मंदिरात आगमन, शिरगाव दुमदुमले; हजारो भाविकांच्‍या उपस्‍थितीत कौलोत्सवाची सांगता

Shirgao Jatrotsav: नामाचा जयघोष आणि हजारो भाविकांच्या उपस्‍थितीत श्री लइराई देवीने शनिवारी रात्री भक्तिमय वातावरणात मंदिरात प्रवेश केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: नामाचा जयघोष आणि हजारो भाविकांच्या उपस्‍थितीत श्री लइराई देवीने शनिवारी रात्री भक्तिमय वातावरणात मंदिरात प्रवेश केला. त्‍यानंतर शिरगावात चार दिवसांपासून सुरू असलेल्या कौलोत्सवाची उत्साहात सांगता झाली.

सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने कौलोत्सवावर पावसाचे सावट होते. मात्र ते ‘विघ्‍न’ दूर होऊन कौलोत्सव उत्‍साहात साजरा झाला.

कौलोत्सवाचा आज शेवटचा दिवस असल्याने संपूर्ण शिरगाव भक्तिरसात न्हाऊन गेले होते. सायंकाळपर्यंत शिरगावात भाविकांची गर्दी नियंत्रणात होती. हजारो भाविकांसह आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही कौल घेतला. कौल घेण्यासाठी भाविकांनी प्रत्येक ठिकाणी रांगा लावल्या होत्या.

रात्री श्री लइराई देवीच्‍या मंदिर परिसरात भाविकांची गर्दी उसळली होती. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही भाविकांना मंदिरात प्रवेश रोखल्याने देवीच्या कळसाचे सुरळीतपणे मंदिरात आगमन झाले. जत्रेनंतर मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या कौलोत्सवाचीही परंपरेप्रमाणे सांगता झाली.

देवी मंदिरात प्रवेश करतेवेळी कोणतीही अनुचित घटना घडली नाही. गेल्या बुधवारपासून कौलोत्सवाला प्रारंभ झाला होता. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास देवीचे मंदिरात आगमन झाले.

रात्री देवी मंदिरात प्रवेश करतेवेळी भाविकांची तोबा गर्दी झाली होती. देवीसह चौगुले आणि काही भाविकांनी मंदिरात प्रवेश केला. पोलिसांनी चोख कामगिरी करताना हजारो भाविकांवर नियंत्रण मिळविले. यावेळी पोलिसांना अक्षरशः कसरत करावी लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT