Lairai Devi Jatra 2024  Dainik Gomantak
गोवा

Lairai Devi Jatra 2024 : हजारो भाविकांनी अनुभवले ‘अग्निदिव्य’; देवी लईराई जत्रोत्सव उत्साहात

Lairai Devi Jatra 2024 : देशी-विदेशी पर्यटकांनीही जत्रेला उपस्थिती लावली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Lairai Devi Jatra 2024 :

डिचोली, श्री लईराईचा जयघोष, धोंडभक्तगणांसह देवीचे अग्निदिव्य आणि हजारो भक्तांच्या साक्षीने शिरगावच्या श्री लईराई देवीचा जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात आणि प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला.

लाखो भक्तांनी प्रत्यक्ष अग्निदिव्याचा थरार अनुभवला. आज (सोमवारी) पहाटे या जत्रोत्सवाची सांगता झाली. यंदा जत्रोत्सवाला भाविकांचा महापूर लोटला होता. दरम्यान, पावसाच्या सावटातही जत्रा सुरळीतपणे साजरी झाली.

जत्रोत्सवानिमित्त काल (रविवारी) सकाळपासूनच धोंडगणांसह भाविकांची पावले शिरगावात वळत होती. दर्शनासाठी सकाळपासूनच मंदिरात भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर गर्दीत वाढ होत गेली. रात्री तर शिरगावात भक्तांचा महापूर लोटला. गोव्यासह शेजारील राज्यांतील धोंड भक्तगण मिळून दोन लाखांहून अधिक भाविकांनी जत्रोत्सवाला उपस्थिती लावल्याचा अंदाज आहे.

देशी-विदेशी पर्यटकांनीही जत्रेला उपस्थिती लावली होती. होमकुंड उत्सवापूर्वी रात्री शिरगावात पावसाचा शिडकावा झाला होता. त्यामुळे भाविकांसह फेरीवाल्यांची चिंता वाढली होती. मात्र देवीच्या कृपेने पावसाचे संकट दूर झाले, अशी भावना भाविक व्यक्त करीत होते.

कौलोत्सवाला प्रारंभ:

दरम्यान, आजपासून (सोमवारी) शिरगावात देवी लईराईच्या कौलोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. कौलोत्सवालाही भाविक गर्दी करतात. चार दिवस गावातील प्रमुख वाड्यावर हा कौलोत्सव साजरा होणार आहे. गुरुवारी (ता.१६) वडाचावाडा येथे कौलोत्सव साजरा झाल्यानंतर देवीच्या कळसाचे मंदिरात आगमन होऊन या उत्सवाची सांगता होणार आहे.

भाविक किरकोळ जखमी:

मध्यरात्री होमकुंडस्थळी प्रचंड गर्दी लोटली होती. या गर्दीच्या रेट्यात अडकल्याने एका मुलासह दोघेजण किरकोळ जखमी झाले. लागलीच गर्दीतून वाट काढीत १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. जखमी भक्तांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. हा अपवाद सोडल्यास जत्रा सुरळीतपणे साजरी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Baina Robbery Case: पोलिसांच्या अकार्यक्षमतेची लक्तरे, 6 दिवस उलटूनही बायणा येथील सशस्त्र दरोड्याचा तपास लागेना

Horoscope: तणाव कमी होऊन मन शांत होईल, नोकरीत बदल होणार; वाचा काय सांगतंय तुमचं भविष्य?

जाहिराती थांबवल्या, कार्यक्रमही रद्द! गोवा पोलिसांच्या निर्देशानंतर 'टेल्स ऑफ कामसूत्रा'वर पडदा; आयोजकांनी व्यक्त केली दिलगिरी

Delhi Red Fort Blast: 2023 पासून दिल्ली 'टार्गेट'वर! बॉम्बस्फोटाची तयारी 2 वर्षांपासून सुरू होती; धक्कादायक खुलासा समोर

"अहवालानंतरच बोलेन!", पूजा नाईकच्या आरोपांवर वीजमंत्री ढवळीकरांची प्रतिक्रिया; Watch Video

SCROLL FOR NEXT