Lairai Devi Jatra Utsav Dainik Gomantak
गोवा

Lairai Devi Jatra 2024 : लईराईदेवी जत्रा : लाखोंची उलाढाल दृष्टीपथात

Lairai Devi Jatra 2024 : शिरगावात उद्यापासून प्रारंभ : भक्तांना देवीच्या दर्शनाची आस

गोमन्तक डिजिटल टीम

Lairai Devi Jatra 2024 :

डिचोली, देश-विदेशात ख्याती असलेल्या श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवाची तयारी पूर्णत्वाकडे आली असून, पूर्ण शिरगावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

‘भक्तांच्या हाकेला धावणारी आई’ असा महिमा आहे, त्या शिरगावच्या श्री लईराई देवीच्या उत्सवासाठी धोंड भक्तगण सज्ज झाले आहेत. या उत्सवादरम्यान लाखो रुपयांची उलाढाल दृष्टीपथात आहे. लाखो भाविकांनी देवीच्या दर्शनाची आस लागली आहे.

येत्या रविवारी (ता. १२) लईराईची जत्रा होणार असली, तरी दूरदूरच्या भाविकांची पावले आधीच शिरगावच्या दिशेने वळू लागली आहेत. जत्रा सुरळीतपणे साजरी होण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेसह अन्य आपत्कालीन व्यवस्था सज्ज झाली आहे.

जत्रोत्सवानिमित्त शिरगावात आकर्षक विद्युत रोषणाई केली असून, फेरीही थाटली आहे.

शिरगावची श्री लईराईदेवी ही लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे. या जत्रोत्सवानिमित्त धोंड भक्तगण व्रतस्थ राहतात. शेजारील राज्यांसह गोव्याच्या कानाकोपऱ्यांतून भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येतात. विशेष म्हणजे, काही विदेशी पर्यटकांचीही देवीवर श्रद्धा आहे. त्यामुळे हे पर्यटक शिरगावात येतात.

होमकुंड हे लईराई देवीच्या जत्रेचे खास वैशिष्ट्य. हे होमकुंड सर्वांत मोठे असते. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने होमखंडी कुटुंबातर्फे होमकुंड रचण्यात येते. हे होमकुंड रचण्याचे काम सध्या सुरू असून रविवारी मध्यरात्रीनंतर हजारो भक्तगणांसह देवी अग्निदिव्य करणार आहे. एकंदरीत श्री लईराईच्या उत्सवासाठी भाविक सज्ज झाले आहेत.

श्री लईराई देवीची जत्रा साजरी करण्यासाठी देवस्थान समिती सज्ज झाली आहे. धोंड भक्तगणांसह भाविकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. शिरगाव सध्या भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. शिस्तबद्ध पद्धतीने जत्रोत्सव साजरा करण्यासाठी समिती कार्यरत आहे.

- भगवंत गावकर, सचिव, देवस्थान.

मोगरीचा सुगंध दरवळू लागला

शिरगावची जत्रा म्हणजे मोगरीच्या फुलांचा उत्सव, असे समीकरण आहे. त्यामुळे जत्रा काळात मोगरीच्या आट्या (वेणी), कळ्यांना प्रचंड मागणी असते. जत्रोत्सवानिमित्त सध्या शिरगावात मोगरीची आवक होत असून, आज मोठ्या प्रमाणात मोगरीची फुले शिरगावात उपलब्ध होती. सध्या शिरगावात मोगरीचा सुगंध दरवळू लागला असून कौलोत्सव आणि देवी मंदिरात जाईपर्यंत मोगरीचा दरवळ कायम राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT