labor market also fills up in Margao Dainik Gomantak
गोवा

मडगावातही भरतो कामगारांचा ‘बाजार’!

भल्‍या सकाळी वर्दळ : वाहतुकीच्‍या कोंडीसह अनेक समस्‍या; व्‍यापारी नाराज

दैनिक गोमन्तक

मडगाव: रोजगारासाठी मडगाव नगरपालिका इमारतीमागे रोज सकाळी शेकडोंच्या संख्येने परप्रांतीय कामगार जमतात. त्यामुळे त्या रस्त्यावर वाहतुकीत व्यत्यय तर येतोच पण त्या भागातील व्यापारी व इतरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या लोकांच्‍या म्हणण्याप्रमाणे हे परप्रांतीय कामगार सकाळी साडेसहा वाजल्‍यापासून तेथे जमू लागतात.

(labor market also fills up in Margao)

सकाळी नऊ ते साडेनऊपर्यंत त्‍यांचा तेथेच मुक्काम असतो. या वेळेत ते पान वा गुटखा चघळून तेथेच थुंकत असतात. कोणी वाहन घेऊन आला तर काम मिळेल म्हणून घोळक्याने धावतात व त्यामुळे अन्य वाहनचालकांची पंचाईत होते.
तेवढ्याने भागत नाही या लोकांना नाश्ता वा कामावर नेण्यासाठी तयार जेवण पुरविणारेही तेथे हजेरी लावू लागल्याने सकाळच्या वेळी तेथील एकंदर परिस्थिती किळसवाणी असते अशा व्यापारी वर्गाच्या तक्रारी आहेत.

सकाळीच उघडतात मद्यालये
गोष्टी तेवढ्यावर थांबत नाही, काहींना दारुशिवाय काम करता येत नाही हे हेरुन मडगाव भागातील बार-ताव्हेर्न आता सकाळीच खुले होऊ लागले आहेत. ही एक नवीन समस्या उभी ठाकली आहे. पूर्वी म्हणजे कोरोनाच्‍या काळात लॉकडाऊनपूर्वी या लोकांचा असाच त्रास होऊ लागल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून कामगारांना तेथे थांबण्यास अटकाव केला होता. तशी कारवाई पुन्हा करण्याची वेळ आली आहे अशी मागणी होत आहे.

कामगारांची पडताळणी व्‍हावी
सरकारने भाडेकरूंसाठी पडताळणी व ओळखपत्र सक्तीचे कले आहे. तशी सक्ती या कामगारांना असावी. एवढ्या मोठ्या संख्येतील हे लोक येतात कुठून, रहातात कुठे, त्यांची पार्श्वभूमी काय हे पडताळण्याची गरज व्यक्त केली जात आहे. रोजगारासाठी त्यांनी येणे वा जाणे याला कोणाचा विरोध नाही. पण त्यातून तयार होत असलेल्या समस्या असह्य असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Court: मतिमंद युवतीवर गेस्ट हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार; शाहजाद शेखचा जामीन फेटाळला

गोव्याला स्वच्छतेचा दुहेरी मान! पणजीसह साखळीला थेट दिल्लीत पुरस्कार; आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Goa Tourism: महिला, लहान मुलांच्या सुरक्षेत हयगय कराल तर खबरदार...; सरकारची हॉटेल्सना सक्त सूचना

Goa Live News: "पाली शिवलिंग धबधब्यावर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध" आमदार डॉ. देविया राणे

Basketball World Championship: गोव्याचा जेशुआ भारताच्या प्रतिनिधित्वासाठी सज्ज, 19 जूलैपासून रंगणार जागतिक विद्यापीठ बास्केटबॉल स्पर्धा

SCROLL FOR NEXT