Pharmaceutical Industry Dainik Gomantak
गोवा

Goa Industries: कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहत सर्वात प्रदूषित

Goa Industries: डॉ. जॉर्सन फर्नांडिस : स्‍वत: प्रदूषण नियंत्रण मंडळच जबाबदार

दैनिक गोमन्तक

Goa Industries: कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहतीत जे प्रदूषण वाढले आहे ते पाहिल्‍यास ही औद्योगिक वसाहत गोव्‍यातील सर्वांत अधिक प्रदूषित वसाहत असे म्‍हणावे लागेल. या औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण वाढण्‍यास स्‍वत: प्रदूषण नियंत्रण मंडळच जबाबदार आहे.

त्‍यांनी दाखविलेल्या अनास्‍थेने कुंकळ्‍ळीच्‍या नागरिकांना या प्रदूषणाच्‍या गर्तेत लोटले आहे, असा आरोप पर्यावरण चळवळीतील सक्रिय असलेले डॉ. जॉर्सन फर्नांडिस यांनी केला.

‘गोमन्तक टीव्‍ही’च्‍या ‘साश्‍‍टीकार’ या कार्यक्रमात डॉ. फर्नांडिस यांनी कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणावर आपली परखड मते व्‍यक्‍त केली. ‘गोमन्‍तक’चे ब्‍युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी हा कार्यक्रम संचालित केला होता. यावेळी कुंकळ्‍ळीचे माजी आमदार आणि माजी मंत्री ज्योकी आलेमाव यांच्‍यावर टीका करताना डॉ. फर्नांडिस म्‍हणाले, त्‍यावेळी आम्‍ही या प्रदूषणावर आवाज उठविला होता.

तेव्हा आलेमाव हे काँग्रेस मंत्रिमंडळात प्रमुख मंत्री होते. त्‍यावेळी आलेमाव यांनी स्‍थानिकांबरोबर न राहता प्रदूषण करणाऱ्या उद्योजकांनाच पाठिंबा दिला. तेव्हा आलेमाव आमच्‍याबरोबर राहिले असते आणि या प्रदूषणाला विरोध केला असता, तर आज आमदार असलेले त्‍यांचे पुत्र युरी आलेमाव यांना प्रदूषणाविरोधात आवाज उठविण्‍याची पाळीच आली नसती.

कोट्यवधींचा दंड लाखांत

कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहतीची रचना करताना तिथे कोणत्‍या प्रकारचे उद्योग येणार याचा कुठलाही अभ्‍यास न केल्‍याने सर्व प्रदूषणकारी आणि वीज आणि पाण्‍याचे भक्षण करणारे उद्योग या वसाहतीत आले. त्‍याचा लोकांवर काय परिणाम होणार याचा कुणीही विचार केला नाही. त्‍यामुळेच सनराईझ झिंकसारखे प्रदूषणकारी उद्योग या वसाहतीत आले. या वसाहतीत सध्‍या प्रदूषण करणाऱ्या मत्‍स्‍य प्रक्रिया उद्योगांच्‍या कारखान्‍यांना कोट्यवधींचा दंड ठोठावलेला असतानाही त्यांच्याकडून काही लाख रुपये भरून घेऊन कारखाने सुरू ठेवण्यास मोकळीक दिली, असे डॉ. फर्नांडिस म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT