Madkai Dainik Gomantak
गोवा

Madkai News : कुंडईत एकेरी वाहतुकीचा सूचना फलक नसल्याने अपघातांना आमंत्रण; पर्यटकांसह वाहनचालकही संभ्रमात

Madkai News : त्यातच पणजीहून फोंड्याच्या दिशेने येणारी परराज्यातील पर्यटक वाहने या ठिकाणी फलक नसल्याने चुकून उतरणीवरील रस्त्याने येत असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला ठोकरण्याचे प्रकार होत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Madkai News :

मडकई, फोंडा - पणजी महामार्गावरील कुंडई येथील एकेरी वाहतुकीच्या रस्त्याबाबत कोणताच फलक नसल्याने या रस्त्यावरून दोन्ही बाजूंनी वाहने येत असल्याने अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.

फोंडा ते पणजी महामार्गावर वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुंडई येथील औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे. या ठिकाणी तपोभूमीचा रस्ता असल्याने वाहतूक बेट तयार झाले आहे.

त्यातच पणजीहून फोंड्याच्या दिशेने येणारी परराज्यातील पर्यटक वाहने या ठिकाणी फलक नसल्याने चुकून उतरणीवरील रस्त्याने येत असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला ठोकरण्याचे प्रकार होत आहेत.

...अन् अपघात होता होता टळला

आठवड्याभरापूर्वी एका परराज्यातील वाहनचालकाला हा रस्ता एकेरी असल्याचे माहीत नसल्याने त्याने भरधाव कार या रस्त्याने हाकल्याने एका दुचाकीला ठोकरले होते. त्यानंतर एका ट्रकचा बसशी अपघात होता होता टळला.

त्यावेळी जागरूक नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून ट्रक पोलिसांच्या ताब्यात दिला होता. अशाप्रकारचे अनेक अपघात या ठिकाणी होत असल्याने आवश्‍यक सूचना फलक उभारण्याची मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: 'लग्न नको'! मडगावातील मुलगी सापडली कोल्हापूरात; विवाहाच्या तगाद्यामुळे घरातून काढला पळ

Goa Politics: खरी कुजबुज; बिबट्यालाही राहायला फ्लॅट हवा!

Ro Ro Ferryboat: रो-रो फेरीबोटींच्या नावावरून गोंधळ! स्थानिक नद्यांची नावे देता आली नाहीत का? अमित पाटकर यांचा सवाल

Panaji: पणजीतील जिवंत माणसाला दाखवले 'मृत'! वीज खात्याचा भोंगळ कारभार; मंत्री ढवळीकर देणार स्पष्टीकरण

Cuncolim Revolt: 442 वर्षांपूर्वी परकीय सत्तेच्‍या विरोधात कुंकळ्‍ळीच्‍या 16 महानायकांनी दिलेला लढा आशिया खंडातील 'पहिला उठाव'

SCROLL FOR NEXT