

म्हापसा: बालरथ चालकांनी शनिवारी सायंकाळी म्हापसा येथील पेडणे क्रीडा संकुलातील स्ट्राँग रूमबाहेर दोन तास ठिय्या दिला. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या दोन दिवसांच्या कामासाठी केवळ ५०० रुपयेच मानधन दिल्याचा आरोप त्यांनी केला.
निवडणूक-संबंधित कर्तव्यादरम्यानचे कामाचे लांबचे तास आणि जबाबदाऱ्या लक्षात घेता ही रक्कम खूप कमी असल्याचे सांगत चालकांनी मानधनाबद्दल असमाधान व्यक्त केले. या चालकांनी दावा केला की, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला (आरओ) भेटण्यासाठी आम्ही तासांहून अधिक वेळ थांबलो.
परंतु ‘आरओ’ने त्यांना भेटण्यास किंवा त्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यास नकार दिला. इतरत्र, चालकांना एक हजार रुपये दिले गेले, पण बार्देशात आम्हाला पाचशे रुपये देण्यात आले. हा भेदभाव आहे.
जवळपास ५० चालकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. कालांतराने चालक केंद्रावरून माघारी परतले. बार्देश तालुक्यातील नऊ मतदारसंघांच्या मतपेट्या पेडे येथील स्ट्राँग रूममध्ये ठेवली असून, याठिकाणी सोमवारी (२२ डिसेंबर) मतमोजणी होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.