Kulem Dainik Gomantak
गोवा

Kulem: धाकट्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने ज्येष्ठही गेला, कुळेतील घटना; एकाच घरातील दोघांचा अंत

Kulem brothers death news: कुळे पंचायत क्षेत्रात बुधवारी सकाळी एकाच कुटुंबातील दोन भावांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

गोमंतक ऑनलाईन टीम

कुळे: कुळे पंचायत क्षेत्रात बुधवारी सकाळी एकाच कुटुंबातील दोन भावांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

शिगाव-कुळे येथे बुधवारी सकाळी धाकट्या भावाला उमाकांत वेळीप (५८) यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णवाहिकेला संपर्क साधला. मात्र, कुळे बाजार परिसरात घडलेल्या अपघातामुळे स्थानिक रुग्णवाहिका अन्य कामात व्यस्त होती.

तत्परतेने दुसरी रुग्णवाहिका रवाना करण्यात आली, पण ती पोहोचेपर्यंत धाकट्या भावाचा मृत्यू झाला. धाकट्याच्या मृत्यूचा जबर धक्का सहन न झाल्याने ज्येष्ठ बंधू संतोष वेळीप (६५) यांनाही हृदयविकाराचा झटका आला.

त्यांना खासगी वाहनातून रुग्णालयात नेत असताना वाटेत रुग्णवाहिका मदतीला धावून आली. मात्र, अर्ध्या वाटेतच त्यांचाहीमृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: मडगाव प्रभाग फेरबदल वादात, सुनावणीत त्रुटी उघड; मतदार विभाजनावर प्रश्नचिन्ह

खरी कुजबुज: काँग्रेसला उशिराने जाग

Goa Accident Death: कर्ती मुलगी गेली; कुटुंब पडले एकाकी, काणकोण येथे कारच्या धडकेत प्राध्यापक सुचिताचा मृत्यू

लुथरा बंधू साडेतीन महिन्यांनंतर आले कोठडीबाहेर, 'एनओसी' प्रकरणातही जामीन; प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलणे टाळले

'पोटनिवडणूक रद्द', मतदानाला 18 तास बाकी असताना उच्च न्यायालयाचा निर्णय; फोंडा आता 11 महिने आमदाराविना!

SCROLL FOR NEXT