Railway Dainik Gomantak
गोवा

Kulem-Kale Railway Track: 15 हेक्टरवरील जंगल हटविण्यास परवानगी द्या! कुळे ते काले लोहमार्ग दुपदरीकरणासाठी मंत्रालयाला साकडे

Kulem to Kale railway doubling: भारतीय वन्यजीव संस्थेने तिनईघाट (कर्नाटक) ते कुळे (गोवा) या रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पाच्या परिणामांवर नवीन अहवाल सादर केला आहे.

Sameer Panditrao

Kulem to Kale railway doubling forest clearance approval

पणजी: कुळे ते काले लोहमार्गाच्या दुपदरीकरणासाठी १५.६ हेक्टरवरील जंगल हटविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी राज्य सरकार आणि रेल विकास निगम लिमिटेडने केली आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या प्रादेशिक अधिकारसंपन्न समितीसमोर असा अर्ज करण्यात आला आहे.

गोवा सरकारने बंगळुरू येथील प्रादेशिक अधिकारसंपन्न समितीकडे अर्ज करून उत्तर गोवा वन विभागाच्या हद्दीतील कुळे-काले विभागातील १५.६ हेक्टर जमिनीवरील वनक्षेत्र हटविण्याच्या आदेशावरील स्थगिती उठविण्याची विनंती केली आहे.

...तरच रेल्वे दुपदरीकरण शक्य

आता भारतीय वन्यजीव संस्थेने तिनईघाट (कर्नाटक) ते कुळे (गोवा) या रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पाच्या परिणामांवर नवीन अहवाल सादर केला आहे.

या अहवालात नदी निचऱ्याच्या सोयी, कुंपण, प्राणी ओलांडण्यासाठी पातळी क्रॉसिंग, वॉर्निंग सिस्टीम, वन्यजीव ओव्हरपास, लहान प्राण्यांसाठी मार्ग, झाडांच्या छतासारख्या पुलांची योजना आदी संरक्षणात्मक उपाय सुचवण्यात आले आहेत.

मात्र, अहवालात, ‘‘ही सर्व उपाययोजना अमलात आणणे शक्य नसेल, तर लोहमार्गाचे दुहेरीकरण करू नये.’’ असे स्पष्टपणे नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT