
पणजी: गोवा आणि कर्नाटकातील पश्चिम घाटातील कॅसलरॉक ते कुळे दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण रद्द करण्याची शिफारस केंद्रीय सशक्त समितीने केली आहे. या शिफारशींना पाठिंबा देण्यासाठी संशोधक आणि वैज्ञानिकांनी संयुक्त निवेदन पाठवले आहे.
संशोधकांनी पर्यावरणीय संवेदनशीलतेच्या दृष्टीने या प्रकल्पाच्या संभाव्य तोट्यांकडे लक्ष वेधले आहे गोवा आणि कर्नाटकातील पश्चिम घाटातील (Western Ghats) हा प्रकल्प पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत विनाशकारी ठरू शकतो. त्यामुळे प्रकल्प संपूर्णपणे रद्द करण्याचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
पश्चिम घाट हा जागतिक स्तरावर जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असून, युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे.प्रस्तावित रेल्वे दुहेरीकरणामुळे पर्यावरणीय हानी होईल, ज्यामुळे वनस्पती, प्राणी, आणि त्यांच्या अधिवासाला धोका निर्माण होईल.प्रकल्पामुळे जंगलातील कॅनॉपी तुटेल, जी अनेक प्राण्यांसाठी महत्त्वाची आहे. तसेच, वनस्पतींचे बीज प्रसार आणि जंगल पुनर्जन्मावरही विपरीत परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
हा रेल्वे मार्ग भगवान महावीर अभयारण्य आणि मोले राष्ट्रीय उद्यानातून जातो, जे गोव्यामधील सर्वात मोठ्या संरक्षित क्षेत्रांपैकी एक आहे.या भागात वाघ, हत्ती यांसारख्या मोठ्या प्राण्यांचे अस्तित्व नोंदवले गेले आहे. प्रकल्पामुळे वन्यजीव मृत्यूंचे प्रमाण वाढेल. राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरण) आणि इतर संस्थांनी या भागाला वाघांसाठी महत्त्वाचा कॉरिडॉर म्हणून मान्यता दिली आहे, याकडे निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे. स्थानिक समुदाय जंगलांवर अवलंबून आहेत आणि हा प्रकल्प त्यांच्या उपजीविकेसाठी हानिकारक ठरेल.
प्रस्तावित रेल्वे मार्ग दुहेरीकरणाचा उद्देश मुख्यतः कोळसा वाहतुकीसाठी असल्याचे सांगितले गेले आहे. मात्र, देशातील कोळसा वापर हळूहळू कमी करण्याचे सरकारचे धोरण आहे. पर्यावरणीय हानीच्या तुलनेत या प्रकल्पातून फारसे आर्थिक फायदे होणार नाहीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रकल्प बांधकाम,अंमलबजावणीच्या टप्प्यातील परिणामांचा योग्य विचार झालेला नाही.जसे की, माती व मलबा व्यवस्थापन, अतिक्रमण, आणि जंगलात नवे रस्ते बांधल्याने होणाऱ्या परिणामांवर उपाय केलेले नाहीत, असे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
हा रेल्वे मार्ग भगवान महावीर अभयारण्य आणि मोले राष्ट्रीय उद्यानातून जातो, जे गोव्यामधील सर्वात मोठ्या संरक्षित क्षेत्रांपैकी एक आहे.या भागात वाघ, हत्ती यांसारख्या मोठ्या प्राण्यांचे अस्तित्व नोंदवले गेले आहे. प्रकल्पामुळे वन्यजीव मृत्यूंचे प्रमाण वाढेल. राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरण) आणि इतर संस्थांनी या भागाला वाघांसाठी महत्त्वाचा कॉरिडॉर म्हणून मान्यता दिली आहे, याकडे निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.