Drowning Death Dainik Gomantak
गोवा

Drowning Death: कुळेत आणखी दोघांचा बुडून मृत्‍यू, दोघेही मूळ कर्नाटकचे; राज्यात गेल्‍या 21 दिवसांत 12 जणांचा दुर्दैवी अंत

Kulem drowning tragedy: बिंबल-कुळे येथील दूधसागर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्‍यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी/ कुळे: राज्‍यामध्ये पाण्यात बुडून मृत्‍यू होण्‍याच्‍या घटनांचे सत्र सुरूच असून, रविवारी बिंबल-कुळे येथील दूधसागर नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्‍यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

शिवलिंगप्पा मंजुनाथ दांडीन आणि सागर बसवराज दांडीन (दोघांचेही वय १७ वर्षे) अशी मृत युवकांची नावे असून, त्‍यांच्‍या निधनामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. गेल्‍या २१ दिवसांत समुद्र आणि नद्यांमध्‍ये बुडून एकूण १२ जणांचा मृत्‍यू झाला आहे. दोघेही मूळचे कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील रहिवासी असून, सध्या ते कुळे परिसरात वास्तव्यास होते. रविवारी ते दोघेही बिंबल येथील बांधाजवळील दूधसागर नदीत आंघोळीसाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात बुडाले.

‘म्हादई’तील धबधब्‍यावर बेकायदा प्रवेश : आठ जणांवर गुन्‍हे

म्हादई अभयारण्यातील जाळवणे धबधबा परिसरात विनापरवानगी प्रवेश केल्याप्रकरणी वन खात्‍याने खानापूर-कर्नाटक येथील आठ जणांविरोधात रविवारी गुन्हे दाखल केले. या परिसरावर खात्‍याच्‍या कर्मचाऱ्यांनी करडी नजर ठेवली आहे.

राज्‍यातील अभयारण्‍यांमध्‍ये बेकायदेशीररीत्‍या विनापरवानगी प्रवेश करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा वन खात्‍याने काही वर्षांपूर्वी दिला आहे. वन्‍य प्राण्‍यांची वर्दळ आणि त्‍यांच्‍या सुरक्षेच्‍या हेतूने हा निर्णय घेण्‍यात आला आहे. तरीही काही पर्यटक प्रवेश करीत असतात.

अधिकृत धबधब्यांनाच भेट देण्याचे आवाहन

गोव्‍यातील जंगल व वन्यजीव अभयारण्यांमधील केवळ अधिकृत परवानगी असलेल्या धबधबा स्थळांनाच पर्यटकांनी भेट द्यावी. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व प्रवेशद्वारांवर सूचना फलक लावण्यात आले असून, त्यांचे पर्यटकांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन वन खात्‍याने केले आहे.

आतापर्यंत ५४ जणांवर कारवाई ; गस्तही सुरू

जाळवणे धबधबा परिसरात अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी आतापर्यंत एकूण ५४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या भागात वारंवार होणारे बेकायदेशीर प्रवेश रोखण्यासाठी वन खात्‍याने कर्नाटकातील पारवाड गावालगतच्या सीमावर्ती भागात विशेष अँटी-पोचिंग कॅम्प सुरू केले आहेत. या परिसरात गस्त सुरू असल्‍याची माहिती वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी दिली.

सुट्ट्यांच्‍या दिवशी नदीकाठी गस्‍त घाला!

गेल्या रविवारी वास्को येथील चार युवकांचा कुळे येथेच बुडून मृत्यू झाल्‍याची घटना घडली होती. त्‍यानंतर पुन्‍हा या रविवारी आणखी दोघांचा बुडून मृत्‍यू झाला. मान्‍सूनचा पाऊस सुरू झाल्‍यानंतर या भागांतील नद्यांत बुडून मृत्‍यू होण्‍याच्‍या घटनांमध्‍ये वाढ होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे कुळे पोलिसांनी सुट्ट्यांच्या दिवशी नदीकाठी गस्त घालावी, अशी मागणी स्‍थानिकांनी केली आहे.

१ जून : कांदोळी समुद्रात बुडून सतीश भोसलेचा मृत्‍यू

५ जून : मळा-पणजीत पाण्‍यात पडल्‍याने एकाचा मृत्‍यू

१० जून : बिर्ला-झुआरीनगर येथे अमृत परवार याचा पोहताना मृत्‍यू

११ जून : श्रीस्‍थळ येथे सुशांत सुमेद याचा मृत्‍यू

१३ जून : कुळे येथील नदीत बुडून चौघांचा अंत

२० जून : म्‍हादई नदीत खुबे काढण्‍यासाठी गेलेल्‍या रूपेश पाळीकर याचा मृत्‍यू

२१ जून : बिंबल येथील दूधसागर नदीत पोहण्‍यासाठी गेलेल्‍या दोघांचा मृत्‍यू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT