Dudhsagar App
Dudhsagar App Dainik Gomantak
गोवा

Dudhsagar App: 'ऑनलाईन' दुधसागर पर्यटनला स्थानिकांचा विरोध

दैनिक गोमन्तक

यंदाचा पर्यटन हंगाम पावसामुळे आठ दिवस पुढे सरकला असला तरी आज पासून पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पर्यटक दुधसागर धबधबा आणि इतर पर्यटन स्थळांना भेट देण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर कुळे येथे वन खात्याच्या प्रवेशद्वाराचेही डॉ. गणेश गावकर यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले.

(Kulem citizen oppose to Dudhsagar App & website)

या पर्यटन हंगामात गोवा प्रशासन कुळे दुधसागर पर्यटन व्यवसाय ऑनलाईन करण्याच्या विचारात असून राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज दूधसागर अ‍ॅप आणि वेबसाइट तयार करण्यासाठी बैठक घेतली. मात्र याला कुळे येथील नागरीकांनी विरोध दर्शवला आहे.

याबाबत स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे की, सरकारने कुळे दुधसागर टुर असोसिएशनचा पर्यटन व्यवसाय ऑनलाईन करण्याच्या हालचाली सूरु केल्या आहेत. त्याला आमचा पुर्ण विरोध आहे. कारण सरकारने याबाबत आमच्या समस्या सोडवल्या पाहीजेत, तसेच आमची ऑनलाईन वेबसाईट तयार आहे, त्या वेबसाईटमधूनच आम्हाला ऑनलाईन बुकींग करण्यास सरकारने मान्यता द्यावी.

एक वेबसाईट असताना आणखी नव्या बसाईटचे नियोजन का ?

एक वेबसाईट आहे, ती आणखी सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित असताना नव्याने दूधसागर अ‍ॅप आणि वेबसाइट अनावरण करणे योग्य नाही. असा नाराजीचा सूर नागरीकातून उमटला. त्यामूळे कुळे नागरीकांचे मत विचारात घेत गोवा प्रशासन योजना आखणार की, नव्याने दूधसागर अ‍ॅप आणि वेबसाइट अनावरण करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT