Goa Tourism: दूधसागर पर्यटन हंगाम सुरु; गणेश गांवकर यांच्या हस्ते उद्‍घाटन!

Goa Tourism: पावसामुळे आठ दिवस हा पर्यटन हंगाम पुढे गेला होता.
Goa Tourism | Dudhsagar Falls
Goa Tourism | Dudhsagar FallsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism: पावसामुळे आठ दिवस हा पर्यटन हंगाम पुढे गेला होता. काल या हंगामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असून पर्यटकांच्या गळ्यात पुष्पहार घालून त्यांना दूधसागर येथे जीपमधून पाठविण्यात आले. तसेच यावेळी कुळे येथे वन खात्याच्या प्रवेशद्वाराचेही डॉ. गणेश गावकर यांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले.

दूधसागर पर्यटना हंगामाला सुरूवात झाली असून दूधसागर येथील पर्यटन हंगामाला सरकारकडून पूर्ण साहाय्य मिळत असल्याने त्याचा लाभ येथील व्यवसाय करणाऱ्या जीप मालकांना होणार आहे.

Goa Tourism | Dudhsagar Falls
Goa Bank: ज्‍येष्‍ठांचा मदतनिधी आता एकाच दिवशी बँकेत जमा होणार

पर्यटकांना सोयीसाठी ठिक ठिकाणी शौचालय उभारले आहे, तसेच चेंजीग रुमची सोय केली आहे, असे प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना गोवा पर्यटन विकास मंडळाचे चेअरमन तथा आमदार डॉ. गणेश गांवकर यांनी सांगितले.

कुळे शिगाव सरपंच गोविंद शिगांवकर, दूधसागर जीप असोसिएशनचे अध्यक्ष अशोक खांडेपारकर, सचिव सत्यवान नाईक, खजिनदार मंगलदास च्यारी, दिलीप मायरेकर, ट्रिबेलो सौझा, अशोक गांवकर, सतीश सातपालकर, नंदीश नाईक देसाई, उपसरपंच नेहा मडकईकर, पंच सदस्य सोनम दहीफोडे, अनिकेत देसाई, साईश नाईक, बेनी आजावेदो, सदानंद बांदोडकर, प्रसाद गांवकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Goa Tourism | Dudhsagar Falls
Goa News: सुभाष वेलिंगकर म्‍हणजे एक योद्धा शिक्षक- दिलीप बेतकेकर

आमदार डॉ.गणेश गांवकर यांचे सहकार्य मिळत आहे. हा व्यवसाय सुरळीत चालावा, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे दूधसागर जीप असोसिएशनचे अध्यक्ष अशोक खांडेपारकर यांनी सांगितले.

टूर ऑपरेटर्सची आज बैठक

दूधसागर टूर ऑपरेटर्सची बैठक 11 रोजी दूधसागर टॅक्सी स्टॅँड या ठिकाणी संध्याकाळी 4 वाजता बोलविण्यात आली आहे. ऑनलाईन व वन खात्याने दिलेल्या अर्जाविषयी चर्चा होणार आहे.

Goa Tourism | Dudhsagar Falls
Goa Bank: ज्‍येष्‍ठांचा मदतनिधी आता एकाच दिवशी बँकेत जमा होणार

पहिल्या दिवशी 43680 महसूल

यंदाचा पर्यटन हंगाम आज सुरुवात झाली असून दुपारी 4 वाजेपर्यंत एकूण 156 जीप गाड्या व 1092 पर्यटकांनी दूधसागर धबधब्याचा आनंद लुटला. पहिल्याच दिवशी कुळे-शिगाव पंचायतीला 43,6,80 रुपये महसूल प्राप्त झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com