Illegal houses demolished! Dainik Gomantak
गोवा

Mapusa: कुचेली कोमुनिदादने चार बेकायदेशीर घरे पाडली!

पीडितांच्या म्हणण्यानुसार कोमुनिदादने कुठलीही पूर्वकल्पना न देताच घरे मोडल्याने आम्ही बेघर झालो.

गोमन्तक डिजिटल टीम

कुचेली कोमुनिदाद जागेत बांधलेली चार बेकायदेशीर घरांवर स्थानिक कोमुनिदादने गुरुवारी कारवाई करीत ही घरे पाडली. दरम्यान, या पीडितांच्या म्हणण्यानुसार कोमुनिदादने कुठलीही पूर्वकल्पना न देताच घरे मोडल्याने आम्ही बेघर झाल्याचा दावा त्यांनी केला.

यासंदर्भात कुचेली कोमुनिदादचे अध्यक्ष मायकल कारास्को म्हणाले की, आम्ही बेकायदेशीरपणे बांधली जात असलेली घरे पाडली. कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून घरे बांधली पाहिजेत, मात्र तसे न करता परस्पर बांधकाम सुरू होते. या संबंधितांना बांधकाम थांबविण्याचे सांगितले होते, तरीही त्यांनी काम सुरूच ठेवले होते. त्यामुळेच ही घरे पाडण्यात आली. यातील तीन घरांचे बांधकाम सुरू होते, तर एका घरात लोक वास्तव्यास होते.

पीडित रहिवाशांनी दावा केला की, ते कोमुनिदादला शुल्क देतात. असे असूनही कोणतीही सूचना न देता बांधकाम पाडण्याचे काम हाती घेतल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. सध्या कोमुनिदाद समितीत बदल झाल्यानेच या नवीन सदस्यांनी कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला.

मायकल कारास्को म्हणाले की, स्थलांतरित बेकायदेशीरपणे कोमुनिदादच्या मालमत्तेवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करताहेत आणि स्थानिक लोक कारवाई करत नसल्याबद्दल कोमुनिदादला दोष देतात. त्यामुळे आम्ही कारवाई केली. आणि सदर अतिक्रमण कारवाई करताना नोटीस देण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT