Kadamba Bus Services for Exposition Mauvin Godinho Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier Exposition: भाविकांसाठी 30 नवीन कदंबा बस सेवा; मार्ग काय, कोणाला फायदा होणर वाचा सविस्तर

Kadamba Bus Services for Exposition: मंगळवारी पाच बसेस पर्यटकांच्या सेवेत रुजू झाल्या असून पणजी,मडगाव, वास्को आणि जुने गोवा येथील पर्यटकांना या बसेस सेवा देत आहेत

Akshata Chhatre

Kadamba Bus Services For Exposition Old Goa

ओल्ड गोवा: गोयेंचो सायब सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शव प्रदर्शन सोहळयाला येणाऱ्या यात्रेकरूंची यात्रा सुरळीत व्हावी म्हणून गोवा राज्य सरकारने कदंबा बसेसची आखणी करून दिली होती. बुधवारी (दि. २७ नोव्हेंबर) परिवहन मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिलेल्या माहितीनुसार कदंबा महामंडळाकडून आणखीन ३० बसेस आखून देण्यात येणार आहे. मंगळवारी आलेल्या पाच बसेस पर्यटकांच्या सेवेत रुजू झाल्या असून पणजी,मडगाव, वास्को आणि जुने गोवा येथील पर्यटकांना या बसेस सेवा देत आहेत.

परिवहन मंत्री माविन गुदिन्हो यांच्या माहितीनुसार राहिलेल्या बसेस देखील लवकरच सेवेत रुजू होणार आहेत. अनेक भागांमधून सेंट झेवियर्स यांच्या दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून समितीने तीन महत्वाच्या ठिकाणाहून प्रत्येकी पाच बसेस तैनाद ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि आता या बसेसच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे.

२१ नोव्हेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ पर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी ९मी. रुंदीच्या इलेट्रीक बसेस आखून दिल्या गेल्या आहेत.

वॅटिकन्सिटीमधल्या नऊ धर्मगुरूंची उपस्थिती

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शव प्रदर्शन सोहळ्याला वॅटिकन्सिटीमधल्या नऊ धर्मगुरूंनी उपस्थिती लावली होती. विदेशातूनन आलेल्या या धर्मगुरूंच्या आगमनामुळे गोव्याच्या समृद्ध इतिहासातील हा क्षण फार महत्वाचा ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT